Tur Rate : कर्नाटकात तूर उत्पादनास फटका बसण्याची शक्यता; दरवाढीचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Tur Rate) सध्या आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कर्नाटकातील तूर उत्पादनास (Tur Rate) मोठा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तूर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील तूर उत्पादनास मोठा फटका बसल्यास त्याचा बाजारभावावर थेट परिणाम होऊन दरवाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

सध्यस्थितीमध्ये कर्नाटकातील काही भागांमध्ये तूर पीक (Tur Rate) उशिरा पेरणी झाल्यामुळे फुलधारणेच्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी शेंगाभरणीच्या अवस्थेत आहे. हे पीक येत्या दोन आठवड्यांमध्ये काढणीला येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आगाऊ पेरणी झालेले पीक काढणीला आले असून, बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात आवक होत आहे. मात्र, वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे फुल गळ आणि पिकाला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तुरीच्या गुणवत्तेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असे कर्नाटकमधील तूर उत्पादक संघाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे.

लागवडीखालील क्षेत्रात घट (Tur Rate In India)

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील तूर लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षीच्या 46.12 लाख हेक्टरवरून, यावर्षी 43.86 लाख हेक्टरपर्यंत घसरले आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटकातील तूर लागवडीखालील क्षेत्र यावर्षी 13.75 लाख हेक्टर इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी 14.15 लाख हेक्टर इतके राहिले होते. महाराष्ट्रातही तूर लागवडीखालील क्षेत्रात घट होऊन ते यावर्षी 11.69 लाख टनांवरून 11.17 लाख हेक्टर इतके नोंदवले गेले आहे. तसेच आंध्रप्रदेशात यावर्षी 2.06 लाख हेक्टरवरून, 1.92 लाख हेक्टरपर्यंत तूर लागवड क्षेत्र घटले आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे याआधीच तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी लागवड क्षेत्रात झालेली घट आणि पीक नुकसानीसह गुणवत्तेला बसलेला फटका यातून आगामी काळात तुरीच्या भाववाढीचे संकेत मिळत आहे.

error: Content is protected !!