Turki Bajari : तुर्कीच्या बाजरीची कमाल; तीन फूट लांब कणीस; बिघ्यात 15 क्विंटल उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही वर्षात बाजरीच्या (Turki Bajari) पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक शेतकरी सध्या फळे, भाजीपाला (Fruits, vegetables) या नगदी पिकांकडे वळत आहे. ज्यामुळे पारंपारिक पद्धतीने होणारी ग्रामीण भागातील ‘गावठी बाजरीची शेती’ आपल्याला अलीकडे पाहायला मिळत नाही. हल्ली हायब्रीड बियाण्याच्या (Hybrid Seeds) माध्यमातून काही प्रमाणात बाजरी लागवड होताना आढळते. मात्र, अशातही काही शेतकऱ्यांनी बाजरी पिकाचे महत्व पुनरुज्जीवित ठेवले आहे. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क तुर्की या देशातील बाजरीचे बियाणे उपलब्ध करत, त्यातून भरघोस उत्पादन घेतले आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या तुर्की बियाण्याच्या बाजरीच्या (Turki Bajari) अनोख्या शेतीबाबत जाणून घेणार आहोत.

बाजरीत कांदा, लसूणचे आंतरपीक (Turki Bajari Baramati Farmer)

नानासाहेब बिचकुले असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पुण्याच्या बारामती तालुक्यातील ढेकळवाडी गावचे रहिवासी आहे. नानासाहेब हे पेशाने शिक्षक असून, त्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात आपल्या 20 गुंठे जमिनीत तुर्की देशातील बियाण्याच्या माध्यमातून बाजरी पीक (Turki Bajari) घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांनी उन्हाळ्यातील पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी बाजरी या पिकामध्ये काही प्रमाणात कांदा (Onion) आणि लसूणचे (Garlic) उत्पादन देखील घेतले आहे. ज्यामुळे त्यांना दुहेरी फायदा मिळण्यास मदत झाली आहे.

बिघ्यात किती उत्पादन?

शिक्षक असलेल्या नानासाहेब यांनी यंदा पहिल्याच वर्षी तुर्की वाणाच्या बाजरीची लागवड केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, पेरणी करण्याऐवजी त्यांनी टोकन पद्धतीने बेडवर बाजरीची लागवड केली. ज्यामुळे त्यांना बियाणे कमी लागल्याचे ते सांगतात. शेतकरी नानासाहेब बिचकुले सांगतात, या बियाण्याच्या बाजरी पिकातून एकरी 40 क्विंटल उत्पादन मिळते. मात्र, आपण एक बिघा जमिनीत या बाजरीची लागवड केली आहे. याशिवाय त्यात आंतरपीक देखील घेतले आहे. ज्यामुळे आपल्याला एका बिघ्यात 15 क्विंटल बाजरी मिळण्याची अपेक्षा आहे.

तुर्की बाजरीचे वैशिष्ट्ये

  • नानासाहेब बिचकुले यांनी प्रति किलो दीड हजार रुपये दराने तुर्की देशातून बियाणे उपलब्ध केले होते.
  • या बियाण्याच्या बाजरीला त्यांना तीन फूट लांब कणीस मिळाली आहेत.
  • प्रति एकरी 40 क्विंटल उत्पादन मिळते.
  • भरघोस उत्पादन मिळवून देणारे वाण म्हणून ओळख.
error: Content is protected !!