Turmeric GI Tag : हिंगोलीच्या हळदीला मिळाले जीआय मानांकन; जगभर ओळख निर्माण होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक (Turmeric GI Tag) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम आणि अकोला या पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होते. राज्यातील या पाच जिल्ह्यांचे मिळून ‘वसमत हळद’ या नावाने नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत विभागाने सोमवारी (ता.2) 6 कृषि उत्पादकांना भौगोलिक मांनाकन जाहीर केले आहे. ज्यात महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याच्या वसमत हळदीला (Turmeric GI Tag) देखील भौगोलिक मांनाकन प्राप्त झाले आहे.

जगभर ओळख निर्माण होणार (Turmeric GI Tag Hingoli District)

परिणामी, आता हिंगोलीच्या हळदीला मिळालेल्या भौगोलिक मांनाकनामुळे (Turmeric GI Tag) जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. हिंगोलीच्या दर्जेदार हळदीची जगभर ओळख निर्माण होऊन, वरील पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हळदीला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील हळद ही आता वसमत हळद या नावाने जगभर प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, 20 ते 24 जूलै 2023 या कालावधीत ग्रेटर नोएडा येथील भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत यांनी सहभाग नोंदवला‌ होता.

वसमत हळदीचे वैशिष्ट्ये

वसमत हळदीला भौगोलिक (जीआय) मानांकन देताना आधुनिक वैद्यकीय शास्त्रात पोटाचे आजार, पित्तविषयक विकार, सर्दी, पडसे, खोकला, भूक मंदावणे, मधुमेहामुळे होणारी जखम, यकृताचे आजार, संधिवात अशा अनेक आजारांवर हळद उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. आपल्या येथील हळदीला अनेक देशांतून मागणी असून, निर्यातवृद्धीची देखील चांगली संधी आहे. आपल्याकडे अनेक कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे.

हळदीसाठी हिंगोली विशेष प्रसिद्ध

हिंगोली जिल्ह्यात हळद लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यापासून शेतकरी दर्जेदार उत्पादनही काढतात. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळावी तसेच हळद उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंगोली हळदीला भौगोलिक मांनाकन मिळण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. त्यास अखेर यश मिळाले आहे.

error: Content is protected !!