Turmeric Harvesting : हळद काढणीसाठी हे यंत्र आहे ‘बेस्ट’; पहा किती आहे किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात यांत्रिक शेतीचे महत्व वाढले आहे. जवळपास सर्वच पातळीवर लागवडीपासून काढणीपर्यंत (Turmeric Harvesting) इतकेच नाही काढणीपश्चात काही बाबींसाठीही यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता हळद पिकाची काढणी आणि त्याची तोडणी करण्यासाठी एक प्रभावी हार्वेस्टरची निर्मिती (Turmeric Harvesting) एका शेतकऱ्याने केली आहे. त्यांच्या या मशीनची किंमत 35 हजार इतकी आहे. त्यांना या हळद काढणी मशीनच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

मजुरीवर मोठा खर्च (Turmeric Harvesting By Machinery)

तामिळनाडू येथील इरोड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद शेती करतात. मात्र हळद शेती करताना शेतकऱ्यांना काढणी व तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. ज्याला मोठया मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता शेतकऱ्यांच्या या समस्येवर तामिळनाडू येथील शेतकरी के पी रामाराजू यांनी जालीम उपाय शोधला आहे. रामाराजू यांनी हळद पिकाच्या काढणीसाठी एका हार्वेस्टरची निर्मिती केली आहे. ज्यामुळे आता हळदीच्या गाठींची काढणी करणे खूप सोपे होणार आहे.

विजेवर कार्य करते

शेतकरी रामाराजू दरवर्षी हळद पिकाची लागवड करतात. मात्र त्यांचे म्हणणे आहे की, हळद शेती करताना मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसतो. बहुधा मजूर न मिळाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. त्यामुळे रामाराजू यांनी हळद पिकाच्या काढणीसाठी या हार्वेस्टरची निर्मिती केली आहे. जे हळद गाठींना खोदून काढण्याचे काम करते. हे काढणी हार्वेस्टर प्रामुख्याने विजेवर चालते. या मशीनला चालवण्यासाठी 13 एचपी ऊर्जेची आवश्यकता असते. या मशीनला हळद खोदणी करण्यासाठी दाते बसवण्यात आले आहे. हे दाते मशीन चालवताना जमिनीच्या आतमध्ये जाऊन हळद पिकाची काढणी करतात. ज्यामुळे हळद पिकाची गाठी विना कष्ट काढण्यास मोठी मदत होते. याशिवाय या मशीनमध्ये घुसळणी प्रक्रिया अवलंबली असल्याने, हळदीची सफाई करणे सोपे जाते. ज्यामुळे हळदीला मातीपासून वेगळे करता येते.

हार्वेस्टरची कार्यक्षमता

रामाराजू यांनी बनवलेले हे हार्वेस्टर 7 तासांमध्ये जवळपास एक एकर क्षेत्रातील पिकाची काढणी करते. मात्र या मशीनला शेतात चालवण्यासाठी एक विशिष्ट अंतराची आवश्यकता असते. त्यामुळे हळद लागवड करताना एक विशिष्ट अंतराने केल्यास फायदेशीर ठरते. या मशीनने काढणी करताना हळदीच्या दोन स्लरीमधील अंतर हे कमीत कमी दीड ते दिन फूट असावे लागते. ड्रीप पद्धतीने लागवड केलेल्या हळद पिकामध्ये हे मशीन चांगल्या प्रकारे चालवले जाऊ शकते. या मशीनला प्रति तास 1 एक लिटर इंधन लागते. या मशीनच्या एखादा सामान्य माणूसही चालवू शकतो.

error: Content is protected !!