Turmeric Planting Method: हळद लागवडीची कमी खर्चिक आणि फायदेशीर ‘प्रो-ट्रे’ पद्धत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हळदीची लागवड (Turmeric Planting Method) सामान्यत: बेण्या द्वारे (कंद) केली जाते. परंतु लागवडीस उपलब्ध बेण्यांची कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे एकरी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना बहुतेकदा मोठ्या संख्येत बेण्यांची लागवड करावी लागते. हळद लागवडीच्या कालावधीत (जून – सप्टेंबर) दर्जेदार बेण्यांची उपलब्धता सुद्धा कमी असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून तामिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईम्बतूर यांनी हळदीच्या रोपांची जलद आणि गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी ‘सिंगल बड राइझोमची (Single Bud Rhizome) ‘प्रो-ट्रे’ पद्धत (Turmeric Planting Method) शोधून काढली.

या पद्धती द्वारे हळद लागवडीसाठी सामान्य पद्धतीपेक्षा 25 टक्के कमी प्रमाणात बेणे लागते. बेणे कट करून लावल्यामुळे रोगग्रस्त बेणे काढून टाकता येतात. त्यामुळे हळद लागवडीसाठी रोगमुक्त बेणे वापरले जातात.  

सिंगल बड राइझोमपासून तयार केलेली हळदीचे निरोगी रोपे लागवडीसाठी (Turmeric Planting Method) वापरता येत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी तर होतेच शिवाय या पद्धतीमुळे हळदीची रोपे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढते.    

प्रो-ट्रे मध्ये हळद लागवडीची पद्धत (Method of planting Turmeric in Pro-Tray)

 • हळद लागवडीसाठी निरोगी कंदांची निवड करा. लागवडीपूर्वी बेण्यांना मॅन्कोझेब (0.3%) आणि क्विनॅलफॉस (0.075%) बिजोपचार करून 30 मिनिटांसाठी आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.
 • लागवडीच्या एक महिन्या अगोदरच, 5-7 ग्रॅम वजनाचे सिंगल बड राइझोमचे तुकडे कापून तयार करावेत.
 • लागवडीपूर्वी 30 मिनिटे अगोदर सिंगल बड राइझोमची मॅन्कोझेबने (0.3%) प्रक्रिया करा.
 • प्रो-ट्रे मध्ये (Turmeric Planting Method) अर्धवट कुजलेले कोकोपीट + गांडूळखत (75: 25) सोबतच ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो मिश्रण  या प्रमाणात भरावे.
 • हळदीच्या रोपांची प्रो-ट्रेमध्ये लागवड करा. प्रो-ट्रे शेड नेटखाली किंवा सावलीत ठेवावे.
 • पाण्याच्या कॅनने किंवा योग्य पद्धत वापरून गरजेनुसार रोपांना सिंचित करत राहावे.  
 • 30-35 दिवसात रोपे लावण्यासाठी तयार होतील.

सिंगल बड रायझोम पद्धतीद्वारे लागवड करण्याचे फायदे (Advantages of Single Bud Rhizome Method)

 • लागवडीसाठी 25 टक्के कमी रायझोम किंवा बेणे लागतात.
 • बेण्यांची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्यामुळे हे बेणे व्यावसायिकदृष्ट्या इतर गरजेसाठी वापरता येतात.
 • लागवड साहित्याच्या खर्चात बचत होते.
 • सामान्य पद्धतीपेक्षा ‘प्रो-ट्रे पद्धतीने हळदीची लागवड केल्यास पि‍काला 1-2 महिने कमी लागतात  
 • रोगग्रस्त बेणे वेळीच काढता येत असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत नाही.
 • रोगांचे प्रभावीपणे जैविक नियंत्रण करता येते.
 • बेण्यांची वाढ लवकर होते. (लागवडीच्या तीन महिन्यांपासून सुरू होतो).
 • या पद्धतीमुळे 1 ते 2 महिने उशिरा येणार्‍या पावसाच्या समस्येवर सुद्धा मात करता येते.
 • रोगमुक्त बेण्यांची निर्मिती होते.
error: Content is protected !!