Turmeric Rate : हळदीचे दर भिडले गगनाला, मिळतोय सोन्याचा भाव; काय आहे दर? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Turmeric Rate : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. मात्र या ठिकाणी जास्त उत्पादन घेतले जात असले तरी इतर जिल्ह्यांमध्ये देखील हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. दरम्यान संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सर्वात जास्त भाव मिळाला आहे. ३० हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव हळदीला मिळाला आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच हळदीचे भाव भविष्यामध्ये अजून वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

वसमतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते. अनेक शेतकरी या ठिकाणी आपली हळद विकण्यासाठी घेऊन येत असतात. दरम्यान या बाजार समितीमध्ये परभणीच्या दिग्रस येथील शेतकऱ्याने हळद विकण्यासाठी ११ पोती आणले होते. यावेळी त्यांच्या हळदीला जवळपास 30 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वात जास्त भाव मानला जात आहे. (Turmeric price)

हळदीचे भाव वाढण्याचे कारण काय?

मागच्या पाच ते सात वर्षापासून हळदीला फक्त चार ते पाच हजार रुपये इतकाच भाव मिळत होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली होती, त्यामुळे हळद बाजारात कमी येऊ लागली परिणामी हळदीला जास्त दर मिळत असल्याचे दिसत आहे. माहितीनुसार, राज्यामध्ये जवळपास 30 टक्के हळद लागवडीचे क्षेत्र घटले आहे त्यामुळे हळदीला चांगला भाव मिळत असल्याचे बोलले जात आहे.

इथे पहा हळदीचा बाजार भाव

तुम्हाला जर हळदीचा बाजारभाव पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi असे सर्च करा. हे सर्च केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi चे ॲप इंस्टॉल करा ॲप इंस्टॉल केल्यानंतर ते ओपन करा आणि त्यामध्ये बाजार भाव हा ऑप्शन सिलेक्ट करा. बाजारभाव हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हळदीचा बाजार भाव पाहू शकतात त्याचबरोबर अन्य शेतमालाचे देखील तुम्ही बाजारभाव पाहू शकता त्यामुळे लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

हळदी पासून अनेक औषध रंग त्याचबरोबर मसाले देखील मोठ्या प्रमाणात बनवले जातात. त्यामुळे हळदीची मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली असल्यामुळे हळदीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे . त्यामुळे हळदीचे भाव वाढले आहेत आणि हे भाव भविष्यात देखील असेच कायम राहू शकतात असा देखील अंदाज वर्तवला आहे.

शेतमाल : हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/08/2023
बसमत (कुरुंडा)लोकलक्विंटल928107852400014000
लोहाराजापुरीक्विंटल1969691450012300
04/08/2023
भोकरक्विंटल2700070007000
हिंगोलीक्विंटल2500140001730015650
वाशीमलोकलक्विंटल300098001650010000
मुंबईलोकलक्विंटल40140001600015000
बसमतलोकलक्विंटल2394121003000021050
सेनगावलोकलक्विंटल100100001450011000
सांगलीराजापुरीक्विंटल87183002010014200
लोहाराजापुरीक्विंटल1050001360012325
error: Content is protected !!