Turmeric Rate: हळदीने ओलांडला 17 हजारांचा टप्पा, जाणून घ्या नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या चार पाच वर्षांपासून हळदीचे दर (Turmeric Rate) कमी झाले होते. यंदा मात्र हळदीच्या दरात (Turmeric Rate) चांगली वाढ झाल्याने वाशीमच्या शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

वाशीमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला 17 हजार 150 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षी हळद साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. मसाला आणि सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीला मागील वर्षी सुरुवातीला भाव मिळत नव्हते. जेमतेम 7 हजारापर्यंत हळदीला भाव मिळाला. मात्र ,आता वाशीमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला उच्चांकी असा 17 हजार 151 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी मागील वर्षी हळद साठवून ठेवली होती त्यांच्या हळदीला सोन्याचा भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी (Turmeric Producer Farmer) आनंद व्यक्त करत आहेत.

खरीप हंगामात लागवड केलेल्या हळद पि‍काला अनेक संकटाचा सामना करावा लागला. हळदीवर करपा रोग आल्याने हळदीची वाढ खुंटली होती परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. सुरुवातीला हळदीला भाव मिळत नव्हता. मात्र आता नवीन हळद बाजारात येण्यापूर्वी जुन्या हळदीला चांगला भाव (Turmeric Rate) मिळत आहे.

शेतकर्‍यांच पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला आधी वाशीम मध्ये खरेदी केले जात नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना आपली हळद बाजूच्या हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) नेऊन विकावी लागत होती. हिंगोलीत हळदीची आवक वाढली की व्यापारी मनमानी पद्धतीने भाव पाडून हळद खरेदी करायचे. मात्र, आता वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळद खरेदी सुरू केली असून हळदीला भावही चांगला मिळत आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत (Vashim Krushi Utpanna Bajar Samiti) दर शनिवारी हळद खरेदी केली जाते. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 मार्च रोजी हळदीला 17 हजार 151 रुपये पर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांकडून समाधान व्यक्त होत आहे, हळद उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दरामुळे दिलासा मिळणार आहे. मसाल्यात हळदीचा वापर होत असल्याने प्रत्येक घरात आणि हॉटेलामध्ये हळदीचा वापर होत असल्याने हळदीला चांगली मागणी असते. मात्र, गेल्या वर्षी सर्वच मसाले पदार्थांच्या दरात वाढ झाली असताना हळदीच्या दरात मात्र वाढ झाली नव्हती. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. गरजेनुसार आवश्यक त्या शेतकर्‍यांनी मागील वर्षी पडलेल्या दरात हळद विकली मात्र ज्या शेतकर्‍यांनी हळद साठवून ठेवली होती. त्या शेतकर्‍याच्या हळदीला सोन्याचे भाव मिळत आहेत. या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे तर आता येणार्‍या नवीन हळदीला सुद्धा चांगला भाव मिळू शकते (Turmeric Rate).

error: Content is protected !!