Udid Market Rate : उडीद दरात 600 रुपयांची घसरण; पहा ‘किती’ मिळतोय दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात मागणीत घट झाल्याने उडीद बाजार सुस्त (Udid Market Rate) असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारातील सुस्ततेमुळे या आठवड्यात उडीद दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात (Udid Market Rate) प्रति क्विंटलमागे 250 ते 600 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. तर उडीद डाळीच्या दरामध्येही या आठवड्यात प्रति क्विंटलमागे 250 ते 500 रुपयांनी घसरण झाली आहे.

महाराष्ट्रातील बाजारभाव

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात प्रति क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. सोलापूर बाजार समितीत उडीदाला या आठवड्यात कमाल 9900 ते किमान 7000 हजार रुपये प्रति क्विंटल. अकोला बाजार समितीत या आठवड्यात उडीदाला 9800 रुपये प्रति क्विंटल. लातूर बाजार समितीत उडीदाला कमाल 9900 रुपये ते किमान 7500 रुपये प्रति क्विंटल तर अहमदनगर बाजार समितीत उडीदाला कमाल 9800 ते किमान 9300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मध्यप्रदेशातील बाजारभाव (Udid Market Rate In India)

मध्यप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात प्रति क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. एमपीच्या अशोकनगर बाजारात समितीत उडीदाला कमाल 8000 ते किमान 6500 रुपये, गंजबासोदा बाजार समितीत कमाल 8500 ते किमान 3500 रुपये प्रति क्विंटल, बीना बाजार समितीत कमाल 7500 ते किमान 5000 रुपये प्रति क्विंटल तर करेली बाजार समितीत कमाल 8000 ते किमान 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आंध्रप्रदेशातील बाजारभाव

दरम्यान आंध्रप्रदेशातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात उडीद दरात प्रति क्विंटलमागे 300 ते 600 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. कृष्णा जिल्ह्यातील बाजार समितीत उडीदाला 9550 रुपये प्रति क्विंटल, तर विजयवाडा जिल्ह्यातील बाजार समितीत उडीदाला कमाल 9700 ते किमान 9500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उडीद डाळीच्या दरातही घसरण

उडीद डाळीच्या दरात या आठवड्यात प्रति क्विंटलमागे 250 ते 500 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीसोबतच जळगाव येथे उडीद डाळीला कमाल 12050 ते किमान 11600 रुपये प्रति क्विंटल, इंदोर येथे कमाल 12300 ते किमान 11000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय मेरठ येथे उडीद डाळीला या आठवड्यात कमाल 10900 ते किमान 9400 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला आहे.

error: Content is protected !!