Ujani Dam Water Shortage: उजनी धरणाची पाण्याची पातळी पोहचली उणे 36 टक्क्यांवर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक (Ujani Dam Water Shortage) आहे. धरणाची पातळी उणे 36 टक्क्यांवर पोहोचली असून, बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे.

सामान्यतः जूनअखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्यामुळे, यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2015 – 16 या वर्षी  उजनी धरण (Ujani Dam) उणे 60 टक्के पर्यंत (Dams Water Shortage) खाली गेले होते, पण यंदाची परिस्थिती त्यापेक्षाही वाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी उन्हाळा हा चिंताजनक जाणार आहे याचे प्रत्यय आताच यायला लागले आहे.

दुष्काळ आणि पाण्याची टंचाई (Ujani Dam Water Shortage)

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर झाला आहे.

उर्वरित तालुक्यांमध्येही पाण्याची टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या दीड टीएमसीपेक्षाही कमी पाणी आहे.

सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा

15 मे पर्यंत सोलापूर ( Solapur) शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून 6 ते 6.5 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

मेअखेर धरणातील अंदाजे 15 टीएमसी पाणी संपेल.

जुलैमधील आषाढी वारीसाठी 2.5 टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागेल.

त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल.

उजनी धरणाची पातळी उणे 70 (Ujani Dam Water Shortage) टक्क्यांपेक्षाही खोलवर जाण्याची शक्यता आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग टाळून जास्तीत जास्त पाणी वाचवणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!