Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांवर; पाणीप्रश्न बिकट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उजनी धरणातील (Ujani Dam) पाणीसाठा मायनस 44 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. ज्यामुळे सध्या सोलापूर, पुणे, नगर आणि धाराशिव या चार प्रमुख शहरांसह धरण क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने, येत्या काही दिवसांत धरणातून पाणी उचलल्यास उजनी धरणातील पाणीसाठा हा इतिहासातील आजवरच्या निच्चांकी पातळीला पोहचण्याची (Ujani Dam) शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाणीसाठा निच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता (Ujani Dam Water Storage)

सोलापूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती असून, पाणीटंचाई दूर करण्यासाठी 10 मे पासून उजनी धरणातून (Ujani Dam) सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतेच यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हे पाणी सोडल्यानंतर, मात्र उजनी धरण त्याच्या इतिहासातील निच्चांकी पातळीला पोचण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या वजा 44 टक्के इतका पाणीसाठा उरला असून, आता सोलापूर शहरासाठी चार गाळ मोरीतून 6 हजार क्युसेक विसर्गाने साडे पाच टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

50 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

सध्याच्या घडीला धरणात असलेले पाणी हे सोलापूरसह आसपासच्या भागाला पुढील 50 दिवस पुरवावे लागणार आहे. यानंतर धरणातून पाणी सोडणे अशक्य होणार आहे. सध्याच्या आदेशानुसार हे पाणी सोडल्यावर उजनी धरण त्याच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी म्हणजे वजा 60 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 30 जून 2019 साली उजनी धरण वजा 58 टक्क्यांपर्यंत नीचांकी पातळीला गेले होते.

उजनी धरणाची सध्याची स्थिती

पाणीपातळी : सध्या उजनी धरणाची पातळी मायनस 44 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
उपलब्ध पाणी : धरणात सध्या केवळ ६६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
सरासरी पाणीपुरवठा : दरम्यान सरासरी 5 ते 5.5 टीएमसी पाणीपुरवठा केला जातो.

error: Content is protected !!