Ujjani Dam : चिंताजनक..! उजनी धरणात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्याच्या अनेक भागांमध्ये कमी पाऊस (Ujjani Dam) झाला आहे. जुलै आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसावर काही प्रमाणात राज्यातील धरणे भरलीही. मात्र आता राज्यातील धरणांनी तळ गाठला असून, भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी उजनी धरण 66 टक्के भरले. मात्र मागील तीनच महिन्यामध्ये उजनी धरणाची पाणीपातळी 19.46 टक्क्यांपर्यंत खाली (Ujjani Dam) घसरली आहे. सध्याच्या घडीला असलेला हा 19.46 टक्के पाणीसाठा आणखी किती दिवस पुरेल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Ujjani Dam 20 Percent Water Reserve)

यावर्षी जून आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसावर उजनी धरण 66 टक्के भरले होते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण इतक्या संथ आणि कमी प्रमाणातील पावसातही उजनी धरणाने आपली 66 टक्के क्षमता पूर्ण केली होती. याच पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी आपली पिके उभी केली होती. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या या आनंदावर विरजण पडणार असून, उभी केलेली पिके तारून न्यायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे डिसेंबर अखेरीस 20 टक्क्यांपर्यत पाणी पातळी खालावल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. सध्या उपलब्ध 19.46 टक्के पाणीसाठा हा किती दिवस पुरेल याबाबत साशंकता असून, परिसरातील पिकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. मात्र आता हिवाळ्यातच उजनी धरणाने तळ गाठल्याने, उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळा काढायचा कसा? असा प्रश्न पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत उजनी धरण 100 टक्के भरलेले होते. तेच धरण हिवाळयात 19.46 टक्क्यांवर आल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचा विचार नाही

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट झाल्याने आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस, केळीसह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह आसपासचे शेतकरी धास्तावले आहे. उजनी धरणासाठी येथील शेतकऱ्यांनी कसदार जमिनी दिल्या, वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली. परंतु प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!