Ujjani Dam : उजनी धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील धरणांची (Ujjani Dam) पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण असलेल्या उजनी धरणात तर सद्यस्थितीमध्ये केवळ 9टक्के इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र असे असतानाही आता उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाण्याचे दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. त्यामुळे उजनी पाणलोट (Ujjani Dam) क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केवळ 9 टक्के पाणीसाठा (Ujjani Dam Second Diversion For Agriculture)

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या महिन्याभराच्या कालावधीत हे आवर्तन सोडले जाणार आहे. सध्यस्थितीत उजनी धरणात (Ujjani Dam) केवळ 9 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत उजनी धरणात 101 टक्के इतका जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. उजनी-भिमा प्रकल्पाद्वारे मागील वर्षी 2022-23 मध्ये प्रत्यक्ष 2 लाख 54 हजार 253 हेक्टर (84.50टक्के) क्षेत्र ओलिताखाली होते. मात्र यावर्षी एल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी घट नोंदवली गेली आहे.

पाण्याच्या नियोजनाचे निर्देश

यावर्षी जून आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसावर उजनी धरण 66 टक्के भरले होते. इतक्या संथ आणि कमी प्रमाणातील पावसातही उजनी धरणाने आपली 66 टक्के क्षमता पूर्ण केली होती. मात्र, तीन आठवड्यापूर्वी उजनी धरणाची पाणीपातळी ही 20 टक्के इतकी नोंदवली गेली होती. त्यात आजच्या मितीला 9 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे उजनी धरणातील उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळयापर्यत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे. तसेच पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला केली आहे.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, करमाळाचे आमदार संजय शिंदे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ, अधिक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!