Ujjwala Yojana Gas : केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी योजना उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. सरकारने या योजनेंतर्गत सिलिंडरवरील अनुदानात 100 रुपयांची वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की “सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत वाढवली आहे.” या घोषणेमुळे योजनेंतर्गत नोंदणीकृत 9.59 कोटी लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. सणांच्या आधी आणि वाढती महागाई पाहता हा मोठा निर्णय मानला जात आहे.
75 लाख नवीन LPG कनेक्शन
आता सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शनचे वितरण करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 75 लाख नवीन एलजीपी कनेक्शनला मंजुरी दिली आहे. येत्या तीन वर्षांत नवीन जोडण्यांवर 1650 कोटी रुपये खर्च केले जातील. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची एकूण संख्या 10.35 कोटी होणार आहे. ही रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांना दिली जाईल.
उज्ज्वला स्कीम २.० चा फायदा कोणाला होणार? (Ujjwala Yojana List name check)
• PMUY वेबसाइटनुसार, गरीब कुटुंबातील प्रौढ महिला ज्यांच्या घरात LPG कनेक्शन नाही ती उज्ज्वला 2.0 योजनेअंतर्गत पात्र मानली जाईल. या योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्याही एका श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
• सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना 2011 अंतर्गत समाविष्ट महिला यासाठी पात्र असतील.
• अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोक, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय, चहा आणि पूर्वीच्या चहाच्या बागेतील जमाती, नदी बेटांवर राहणारे लोक (लाभार्थ्यांना आवश्यक ती सहाय्यक कागदपत्रे सादर करावी लागतील).
• जर एखादी महिला वरील दोन श्रेणींमध्ये येत नसेल, तर ती 14-सुत्रीय घोषणापत्र (विहित नमुन्यानुसार) देऊन गरीब कुटुंबांतर्गत लाभार्थी असल्याचा दावा करू शकते.