Unseasonal Rain : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपयांचा निधी मंजूर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2109 कोटी (दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Unseasonal Rain) यांनी दिली आहे.

3 हेक्टरपर्यंत मिळणार मदत (Unseasonal Rain 2109 Crore Fund Approved)

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे. याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. मात्र नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार ही मदत दिली आहे. असेही पाटील यांनी म्हटले आहे.

विभागीय आयुक्तांचे प्रस्ताव प्राप्त

नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये नागपूर विभाग 11887.63 लाख रुपये, कोकण विभाग 485.09 लाख रुपये, अमरावती विभाग 109589.07 लाख रुपये, पुणे विभाग 15903.33 लाख रुपये, संभाजीनगर विभागाकडून 70992.41 लाख रुपये निधीचा मिळण्याच्या मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या पाचही विभागातील शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापूर्वी 10 जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता 144 कोटी निधी मंजूर केला असल्याचेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!