Unseasonal Rain : अवकाळीग्रस्तांना वाढीव दराने नुकसान भरपाई; विभागीय आयुक्तांचे निर्देश!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट यामुळे राज्यासह नागपूर विभागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याकरिता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी (Unseasonal Rain) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  

विभागीय आयुक्त बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत. यावेळी विभागातील गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित होते. राज्यात 26 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान व पुढील कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यासह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकारचा आदेश प्राप्त झाला आहे.

नव्याने माहिती पाठवावी (Unseasonal Rain Compensation Increase)

राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांकडून प्राप्त माहितीनुसार एकूण 55157.43 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 7464.851 लाख निधीची मागणी अहवाल सादर केला होता. पुढे 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार 1 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यास अनुसरुन विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या 19 जानेवारी पर्यंत नव्याने माहिती पाठविण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले आहे.

महावितरणला साहाय्य करावे

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विभागात एकूण 277 उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. यापैकी 186 उपकेंद्रासाठी सरकारी जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. तर 48 उपकेंद्रासाठी अंशत: जमीन शेतकऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे. उर्वरित 43 उपकेंद्रांसाठी खासगी मालकीची जमीन महावितरण कंपनीला उपलब्ध करुन देण्यास आवश्यक मदत करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त बिदरी यांनी दिल्या आहे.

error: Content is protected !!