Unseasonal Rain : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी रक्कम; कृषिमंत्र्यांची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. खरिपाची पिके (Unseasonal Rain) हातून गेलेली असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 27 हजार रुपये तर बारमाही पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार आहे. याशिवाय अन्य पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर (Unseasonal Rain) इतकी मदत दिली जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ऐतिहासिक मदत (Unseasonal Rain Crop Damaged Farmers)

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दिली जाणारी ही ऐतिहासिक मदत आहे. याआधी इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून कधीही देण्यात आलेली नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. मात्र यावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहे.

सर्व पिकांसाठी भरपाई मिळणार

राज्यातील नैसर्गिक आपत्तीने घेरलेल्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कारण यावर्षीचा खरीप हंगाम असो वा अवकाळी पावसाने घेतलेला रब्बी हंगाम असो, सर्व शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. यावर्षी पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या मदतीची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

खरीप पिकांसाठी सरसकट मदत

राज्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याशिवाय त्यात आंतरपीक म्हणून मूग, तूर, आणि उडीद यांची लागवड होते. मात्र या सर्व पिकांना सरसकट एका शेतकऱ्याला 3 हेक्टरसाठी ही मदत दिली जाईल. या पिकांसाठी प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. असेही मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांना या पिकांसाठी एक रुपयात पीक विम्याचे कवचही असणार आहे. असेही ते म्हणाले आहे.

error: Content is protected !!