Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने पाऊस अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसत आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात अधिक पिके नसतात. मात्र, मागील 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने जवळपास राज्यातील 21 जिल्ह्यांना आपल्या कवेत घेतले आहे. ज्यामुळे राज्यात आतापर्यंत 21 जिल्ह्यांमध्ये एकूण 97 हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मोठा फटका बसला आहे. असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पंचनामे करण्यात विलंब (Unseasonal Rain In Maharashtra)

सध्याच्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणात व निवडणूक ड्युटीमुळे पंचनामे सुरु झालेले नाहीत, अशी स्थिती आहे. ज्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्यांची गती पाहता मदतीसाठी आणखी काही दिवस बाधित शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार असल्याचे अधोरेखीत होत आहे.

आधीच दुष्काळ त्यात अवकाळीचा फटका

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिके संपूर्णतः वाया गेली. अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना सर्व पिकांचा पीकविमा मिळालेला नाही. त्यानंतर राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आणि त्या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील मंजूर केली. मात्र, अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देखील मिळालेली नाही. अशातच आता एप्रिलमधील अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका राज्यातील 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बसला असून, त्यात जवळपास 97 हजार हेक्टरवरील विशेषत: फळबागांना फटका बसला आहे.

यंत्रणा जुंपली निवडणूक कामांना

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबे गळून पडले आहेत. आता ज्या भागात 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यांना सरकारी नियमाप्रमाणे भरपाई मिळेल. पण, त्यासाठी पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला सादर होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या प्रशासन निवडणूक कामांसाठी जुंपल्याने, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार कधी? असा प्रश्न आता नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करत आहे.

error: Content is protected !!