Unseasonal Rains Damage Crops: विदर्भात अवकाळी पावसाने आंबा, भात आणि टोमॅटो पिकाचे नुकसान; जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल सादर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागच्या आठवड्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rains Damage Crops) राज्याच्या विविध भागात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात थैमान घातलेला होता. काही ठिकाणी गारपीट (Hailstorm)तर कुठं वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार पाऊस पडल्याने शेतकर्‍यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यात 257 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून याचा फटका 424 शेतकर्‍यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला आणि फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे (Unseasonal Rains Damage Crops).

सलग तिसर्‍या दिवसाच्या पावसाने वीजपुरवठा खंडित  (Unseasonal Rains Damage Crops)

यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये पहाटे तीन वाजता दरम्यान जोरदार वादळ वाऱ्यांसह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. यावेळी काही भागात गाराही पडल्या. या अर्धा तास झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पाळेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीळ या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे (Panchnama Of Affected Land) करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहेत. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला (Power Supply Interrupted) असून अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे.

गारांमुळे टोमॅटोचं नुकसान (Unseasonal Rains Damage Crops)

वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकर्‍यांचे नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे बागायत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा, आंबे अशा फळझाडाची (Fruit Crops) पडझड झाली. तर नारा येथील रामकृष्ण मानमोडे यांच्या तीन एकर शेतात टमाटर, भेंडी, वांगे, कांदे असा भाजीपाला पीक लावले होते. तोडणीला आलेल्या टमाटर पिकावर (Tomato Crop) गार पडली. यामुळे टमाटर फुटले आणि गळून पडले आहे. तोडणीला आलेले टमाटर गारपीट झाल्याने कुजले असून जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्या भरापासून चौथ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rains Damage Crops) बरसत असल्याने शेतकर्‍यामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात पाऊस बरसल्याने मॉन्सून (Monsoon) लांबणीवर जाण्याची भीती आहे.

error: Content is protected !!