Urea Fertilizer : सोयाबीन पिकासाठी तुम्हीही युरिया खताचा वापर करताय का? तर थांबा; कृषी तज्ञांचा ‘हा’ महत्वाचा सल्ला जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Urea Fertilizer : जून महिन्यामध्ये म्हणावा असा पाऊस झाला नव्हता त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या देखील झाल्या आहेत. खरीप हंगाम 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्व ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आहेत. सध्या शेतकरी पिकांना खताचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात युरिया खताची मागणी वाढल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीचा विचार केला तर बाजारामध्ये विविध ग्रेडच्या खतांची आवश्यकतेनुसार उपलब्धता असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग इत्यादी पिकांसाठी पेरणी पश्चात युरिया खताचा वापर टाळावा असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे. (Urea Fertilizer)

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सर्वात कमी किंमतींत खाते कशी खरेदी करायची?

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुम्हाला हवं ते खत अगदी योग्य किंमतीत खरेदी करू शकता. आजपर्यंत आपण फक्त आपल्या विशिष्ट खत विक्रेत्याकडे खताची चौकशी करत होतो. परंतु आता तुम्ही तुमच्या गावाच्या जवळच्या सर्व खत दुकानदारांकडे तुम्हाला हवं असलेलं खत किती रुपयांना मिळतंय याची माहिती घरी बसून मोबाईलवरून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करावे लागेल. यामधील शेतकरी दुकान या विभागात खतासोबतच जमीन खरेदी विक्री, जनावरांची खरेदी विक्री अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तेव्हा आजच हॅलो कृषी डाउनलोड करा आणि लाभार्थी बना.

युरियाचा वापर केल्याने पिकांची चांगली वाढ होते पिकांची पाने लुसलुशीत होतात त्यामुळे यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढतो त्यामुळे कीटकनाशकांची देखील फवारणी करावी लागते आणि खर्चही शेतकऱ्यांचा मोठा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी युरिया खताचा वापर टाळावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यांमध्ये युरिया खताची मागणी मंजुर आवंटन, आजपर्यंत झालेला पुरवठा, विक्री व शिल्लक असा आत्तापर्यंतचा एकूण तपशील पाहिल्यास या जिल्ह्यासाठी खरीप 2023 मध्ये 2205 मेट्रिक टन युरिया खताची मागणी करण्यात आली होती. यापैकी 11625मेट्रिक खताची विक्री करण्यात आली असून अजून 2995 मेट्रिक युरिया शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिल्लक युरिया सर्व शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी किरकोळ खत विक्रेत्यांनी सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त विक्री करू नये असे देखील कृषी विभागाने आवाहन केले आहे.

युरियाचा जास्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव होतो

प्रत्येक शेतकऱ्याला असे वाटते की आपले पीक चांगले यावे त्यातून चांगले उत्पन्न मिळावे परिणामी आपल्याला नफा देखील चांगला मिळेल. यासाठी शेतकरी पेरणी करताना युरियाचा वापर करतात. युरियामुळे शेतकऱ्याचे पीक एकदम हिरवे लुसलुशीत होते. पिकाची पाने देखील मोठी होतात मात्र याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. यावर किडी आणि रोगाचा लगेच प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे युरियाचा जास्त वापर करणे टाळावे असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आव्हान केले आहे

सोयाबीनचा बाजारभाव कुठे पाहणार?

शेतकरी मित्रांनो आता ताजा बाजारभाव पाहणे सोपे झाले आहे कारण की, आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनवले आहे. खास शेतकऱ्यांचा विचार करून आम्ही हे अँप बनवले आहे. hello Krushi अस आमच्या ॲपचं नाव आहे. त्यामुळे तुम्हाला जर रोजचा बाजार भाव चेक करायचा असेल तर लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि hello Krushi असे सर्च करून आपले हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!