Urea Gold Fertilizer: युरिया गोल्ड लाँच करण्यास सरकारची मान्यता, शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारनं युरिया गोल्ड (Urea Gold fertilizer) लॉन्च  करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. शनिवारी 6 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सल्फर कोटेड युरिया लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे युरिया गोल्ड आता शेतकऱ्यांपर्यंत (Farmers) पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सल्फर कोटेड युरिया युरिया गोल्ड (Urea Gold Fertilizer) या नावानं विकला जाणार आहे. त्याच्या 40 किलोच्या बॅगची किंमत ही 266.50 रुपये असणार आहे. यामुळं शेतकऱ्यांचा युरियावरील खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

सर्व कंपन्यांना सूचना पाठवल्या

मिळालेल्या माहितीनुसार, रसायन आणि खते मंत्रालयाने या निर्णयाची अधिसूचना सर्व खत उत्पादक कंपन्यांच्या एमडी आणि सीएमडींना जारी केली आहे. 28 जून 2023 रोजी झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीने (CCEA) सल्फर कोटेड यूरियाला ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold Fertilizer) नावाने लॉन्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

युरिया गोल्ड युरियाची किंमत किती? (Price Of Urea Gold Fertilizer)

मिळालेल्या माहितीनुसार, युरिया गोल्ड (Urea Gold Fertilizer) 40 किलोच्या बॅगमध्ये विकले जाणार आहे. त्याची किंमत नीम कोटेड युरियाच्या 45 किलोच्या पिशवीएवढी असेल. नीम कोटेड युरियाच्या पिशवीची एमआरपी जीएसटीसह 266.50 रुपये आहे. दोन्हीचे भाव समान ठेवल्याने शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही. याशिवाय शेतकरी अधिक पर्यावरणपूरक युरियाचा वापर करेल.

मातीची क्षमता वाढेल (The potential of soil will increase)

सल्फर-लेपित युरिया मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, पोषक तत्वांचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आणि चांगले पीक उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. गोल्ड युरियाच्या मदतीने पर्यावरणाला मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा

युरिया गोल्डमुळं जमिनीत सल्फरची कमतरता भासणार नाही. युरिया गोल्डच्या (Urea Gold fertilizer) वापरामुळं नायट्रोजनचा अधिक चांगला वापर करण्याची वनस्पतींची क्षमता वाढते. याशिवाय युरियाचा वापरही कमी होऊन, याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होईल. भारतातील शेतीयोग्य जमिनीची स्थिती बिकट होत चालली आहे. युरियाच्या अंदाधुंद वापरामुळं जमिनीची सुपीकता आणि उत्पन्नही कमी होत आहे. हा ‘युरिया गोल्ड’ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (RCF) कंपनीद्वारे तयार केला जात आहे.

इतर खतांपेक्षा युरिया गोल्ड उत्तम 

सल्फर लेपित युरियामधून नायट्रोजन हळूहळू बाहेर पडतो. ‘युरिया गोल्ड’ यामध्ये ह्युमिक ऍसिड असल्यामुळे त्याचे आयुष्य जास्त असते. सध्याच्या युरियाला हा एक चांगला पर्याय आहे. माहितीनुसार, 15 किलो ‘युरिया गोल्ड’ हा  20 किलो पारंपरिक युरियाएवढा फायदेशीर ठरेल.

error: Content is protected !!