Urea Import : 2025 च्या शेवटीपर्यंत युरिया निर्मितीत भारत स्वयंपूर्ण होणार – मनसुख मंडाविया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेती करताना युरिया (Urea Import) या खताचा सर्वाधिक वापर करतात. गेल्या 60 ते 65 वर्षांपासून शेतीमध्ये पिकांसाठी गोणी स्वरूपातील युरिया वापरला जात आहे. मात्र आता देशामध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांची निर्मिती केली जात आहे. ज्यामुळे 2025 च्या शेवटीपर्यंत देश युरिया खताचा निर्मितीत स्वयंपूर्ण झालेला असेल, असे केंद्रीय रसायने आणि खते (Urea Import) विभागाचे मंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे.

310 लाख टनांपर्यंत वाढ (Urea Import In India)

केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री मनसुख मंडाविया यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, 2014-15 मध्ये देशातील युरिया निर्मितीची क्षमता 225 लाख टन इतकी होती. ज्यात सध्या 310 लाख टनांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. अर्थात देशातील एकूण युरियाच्या मागणीच्या तुलनेत सध्या केवळ 40 लाख टन युरियाचे उत्पादन कमी आहे. आगामी वर्षभरात युरिया क्षमता 325 लाख टनांपर्यंत वाढवली जाणार असून, उर्वरित 20-25 लाख टन युरियाची गरज ही नॅनो युरियाच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. त्यामुळे वर्ष 2025 च्या शेवटी बाहेरील देशांमधून केली जाणार युरिया आयात (Urea Import) ही पूर्णपणे थांबणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

युरिया आयातीत मोठी घट

दरम्यान, केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशात एकूण 75.8 लाख टन युरिया आयात (Urea Import) नोंदवली गेली होती. 2021-22 मध्ये 91.36 लाख टन, 2020-21 मध्ये 98.28 लाख टन, 2019-20 मध्ये 91.23 लाख टन आणि 2018-19 मध्ये 74.81 लाख टन युरिया आयात नोंदवली गेली होती. तर केंद्र सरकारकडून 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण 1.64 लाख कोटींचे अनुदान शेतकऱ्यांसाठी दिले गेले आहे. मोदी सरकारने मागील १० वर्षांमध्ये शेतीमध्ये खतांचा बेसुमार वापर कमी करण्यात यश मिळवले आहे. असेही मनसुख मंडाविया यांनी म्हटले आहे.

नॅनो युरियामूळे मागणी घटली

ऑगस्ट 2021 पासून ते फेब्रुवारी 2024 या काळात देशभरात एकूण 7 कोटी नॅनो युरियाच्या बॉटल विक्री करण्यात आल्या आहेत. अर्धा लिटरची एक नॅनो युरियाची बॉटल ही एका 45 किलोच्या गोणीच्या बरोबरीने असते. त्यामुळे केंद्र सरकारने वैकल्पिक खतांच्या निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 2023-24 या आर्थिक वर्षात नॅनो युरियाच्या निर्मितीमुळे युरियाच्या मागणीत 25 लाख टन घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!