Vangi Bajar Bhav : चंपाषष्टीमुळे वांग्याच्या दरात दुपटीने वाढ; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वांगी दरात (Vangi Bajar Bhav) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी (ता.15) सोलापूर बाजार समितीत वांग्याला प्रति क्विंटल 6000 हजार रुपये (60 रुपये प्रति किलो) दर मिळत होता. मात्र आज सोलापूर बाजार समितीत वांग्याला विक्रमी 10 हजार रुपये (100 रुपये प्रति किलो) प्रति इतका दर (Vangi Bajar Bhav) मिळाला आहे. तर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीतही विक्रमी 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सोलापुरात विक्रमी भाव (Vangi Bajar Bhav Price Doubles)

आज चंपाषष्टी असल्याने वांग्याला (Vangi Bajar Bhav) विशेष मागणी असते. त्यामुळे अचानक झालेल्या मागणीतील वाढीमुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज (ता.18) राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये वांग्याला प्रति क्विंटलमध्ये मिळालेला दर पुढीलप्रमाणे आहे. आज सोलापूर बाजार समितीत 27 क्विंटल वांग्याची आवक झाली आहे. तर कमाल 10 हजार ते 1000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत वांग्याची 36 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12 हजार ते 2900 तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत वांग्याची आवक झाली असून, कमाल 6 हजार ते 3000 तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अन्य शहरांमधील दर

कोल्हापूर बाजार समितीत (Vangi Bajar Bhav) आज वांग्याची 82 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7 हजार ते 2500 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नाशिक बाजार समितीत आज वांग्याची 135 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8 हजार ते 3000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पुणे-पिंपरी बाजार समितीत आज वांग्याची 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7 हजार ते 3000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पुणे बाजार समितीत आज वांग्याची 402 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6 हजार ते 2000 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आज चंपाषष्टीच्या असल्या कारणाने, या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते. नैवैद्य प्रसादाचा भाग म्हणून, वांग्याच्या भरताचा (Vangi Bajar Bhav) समावेश आहे. त्यामुळे आजच्या दिवशी वांग्याच्या भरीताला विशेष महत्व असते. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या मागणीमुळे दरात दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. किरकोळ बाजारातही चार दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या वांग्यांला चंपाषष्टी सणामुळे 80 ते 120 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.

error: Content is protected !!