Vangi Bajar Bhav : वांग्याच्या दरात घसरण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात चंपाषष्ठीच्या कालावधीत वांग्याच्या दरात (Vangi Bajar Bhav) मोठी वाढ झाली होती. जी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कायम होती, मात्र आता मागील 15 दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांग्याच्या दरात घसरण सुरूच असून, आज सोलापूर बाजार समितीत वांग्यांचे भाव कमाल 7000 ते किमान 2000 तर 4000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. चंपाषष्ठीनंतर वांग्याला (Vangi Bajar Bhav) सोलापूर बाजार समितीत प्रति क्विंटल कमाल 12000 रुपयांपर्यंत दर मिळत होता.

आजचे वांगी बाजारभाव (Vangi Bajar Bhav Today 10 Jan 2024)

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (Vangi Bajar Bhav) बाजार समितीत आज 39 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5900 ते किमान 900 तर सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज बाजार समितीत आज 15 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 3000 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2500 ते किमान 1500 तर सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज 177 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5500 ते किमान 1600 तर सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल, श्रीरामपूर बाजार समितीत आज 11 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 3500 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बाजार समितीत आज 20 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4000 ते किमान 2500 तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, वाई बाजार समितीत आज 8 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 4000 तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, कामठी बाजार समितीत आज 7 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2500 ते किमान 1500 तर सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत आज 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7300 ते किमान 2500 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज 132 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4000 ते किमान 1000 तर सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उत्पादन खर्च अधिक

शेतकरी दर मिळण्यासह कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवण्याच्या अपेक्षेने भाजीपाला पिकांची लागवड करतात. त्यात सर्वाधिक शेतकरी वांगी पिकाला प्राधान्य देतात. मात्र सध्या वांगी दरात मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या मानाने दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. वांग्याच्या पिकाला नियमित औषध फवारणी करावी लागते. अन्यथा अळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. मात्र नियमित फवारण्या घेऊनही झालेल्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना संतापाला सामोरे जावे लागत आहे.

error: Content is protected !!