Vangi Bajar Bhav : वांग्याच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांग्याच्या दरात (Vangi Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. चालू महिन्याच्या सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र आता वांग्याचे दर निम्म्याने घसरून सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.18) नाशिक बाजार समितीत वांग्याला कमाल 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. जो आज 4000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे वांगी उत्पादक (Vangi Bajar Bhav) शेतकऱ्यांना उत्पादन खर्च ही मिळणे मुश्किल झाले आहे.

आजचे वांगी बाजारभाव (Vangi Bajar Bhav Today 22 Jan 2024)

नाशिक बाजार समितीत आज वांग्याची 73 क्विंटल आवक झाली असून, कामा; कमाल 4000 ते किमान 2500 तर सरासरी 3250 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत आज वांग्याची 60 क्विंटल आवक झाली असून, कामा; कमाल 4300 ते किमान 600 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज बाजार समितीत आज वांग्याची 25 क्विंटल आवक झाली असून, कामा; कमाल 2000 ते किमान 1000 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज वांग्याची 218 क्विंटल आवक झाली असून, कामा; कमाल 2500 ते किमान 1000 तर सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल, पुणे (मोशी) बाजार समितीत आज वांग्याची 74 क्विंटल आवक झाली असून, कामा; कमाल 3000 ते किमान 2000 तर सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

15 दिवसांमध्ये निम्म्याने घसरण

गेल्या महिनाभरात वांग्याच्या दरात (Vangi Bajar Bhav) शेतकऱ्यांना मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीत चंपाषष्ठी या सणाच्या कालावधीत वांग्याचे दर विक्रमी 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले होते. जे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यत कायम होते. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेली वांग्याच्या दरातील घसरण अद्यापही कायम असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये वांगी दराने तळ गाठला आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला वांग्याला अनेक बाजार समित्यांमध्ये ६००० ते ७००० हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत होता. मात्र त्यात गेल्या 15 दिवसांमध्ये वांग्याचे दर जवळपास निम्म्याने घसरले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले आहे, वांग्याच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने फवारणीसाठी मोठा खर्च होत असलयाचे शेतकरी सांगतात.

error: Content is protected !!