हॅलो कृषी ऑनलाईन : चंपा षष्ठीमुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागील आठवड्यात वांगी दरात (Vangi Bajar Bhav) तेजी पाहायला मिळाली होती. ही तेजी आजही कायम असून, आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत वांग्याची 28 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12500 ते किमान 1100 रुपये ते सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी (ता.18) वांग्याला मंगळवेढा बाजार समितीत कमाल 12000 ते किमान 2900 रुपये तर सरासरी 6800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. अर्थात वांग्याला बाजारात (Vangi Bajar Bhav) सध्या जवळपास 75 ते 125 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.
आजचे प्रमुख बाजार समित्यांमधील दर (Vangi Bajar Bhav 25 Dec 2023)
आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीत वांग्याची 15 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज वांग्याची 57 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, नाशिक बाजार समितीत आज वांग्याची 113 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
पुणे बाजार समितीत आज वांग्याची 186 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मोर्शी बाजार समितीत आज वांग्याची 55 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, सातारा जिल्ह्यातील वाई बाजार समितीत आज वांग्याची 10 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
आवकेत घट
चंपाषष्ठी सणाच्या पार्श्वभूमीवर वांगी दराला (Vangi Bajar Bhav) झळाळी आली होती. ती अजूनही कायम आहे. प्रामुख्याने बाजारात सध्या वांग्याची आवक कमी असल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वांगी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. चंपाषष्ठीनंतर बाजारातील वांग्याची मागणी कायम असून, पुरवठा घटल्याने दर त्याच पातळीवर टिकून आहेत.