Vangi Bajar Bhav : वांगी उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना; पहा… आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिनाभरापासून सुरु असलेली वांग्याच्या दरातील (Vangi Bajar Bhav) घसरण कायम असून, सध्या राज्यात वांग्याच्या दराने तळ गाठला आहे. राज्यात सध्या सरासरी 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दराने वांग्याची विक्री होत आहे. यंदा पाण्याची कमतरता असूनही अनेक शेतकरी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून पीक घेतले आहे. वांग्यावर किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत असल्याने त्यासाठी सतत फवारण्या घ्याव्या लागतात. मात्र, आता या शेतकऱ्यांना योग्य दर (Vangi Bajar Bhav) मिळत नसल्याने, उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्कील झाले आहे.

सर्वाधिक दर कुठे? (Vangi Bajar Bhav Today 5 Feb 2024)

श्रीरामपूर बाजार समितीत आज वांग्याची (Vangi Bajar Bhav) 13 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3500 ते किमान 2000 तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अहमदनगर बाजार समितीत आज 54 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3000 ते किमान 500 तर सरासरी 1750 रुपये, नाशिक बाजार समितीत आज 170 क्विंटल आवक झाली असून, कमाल 3000 ते किमान 1000 तर सरासरी 2000 रुपये, पुणे -पिंपरी बाजार समितीत आज 6 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2500 ते किमान 2000 तर सरासरी 2250 रुपये, वाई (सातारा) बाजार समितीत आज 8 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2500 ते किमान 2000 तर सरासरी 2250 रुपये, मंगळवेढा (सोलापूर) बाजार समितीत आज 59 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2600 ते किमान 200 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कमी दर कुठे?

अकलुज (सोलापूर) बाजार समितीत आज 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 1000 तर सरासरी 1500 रुपये, कोल्हापूर बाजार समितीत आज 87 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 500 तर सरासरी 1200 रुपये, सातारा बाजार समितीत आज 30 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 1000 तर सरासरी 1500 रुपये, सोलापूर बाजार समितीत आज 27 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 400 तर सरासरी 1000 रुपये, पुणे बाजार समितीत आज 243 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 800 तर सरासरी 1400 रुपये, कामठी (नागपूर) बाजार समितीत आज 243 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 1000 तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर मुंबई, नागपूर या दोनही बाजार समित्यांमध्ये सध्या वांग्याला सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

अशाच पद्धतीने रोजचे सर्व भाजीपाल्याचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

महिनाभरात दर निच्चांकी पातळीवर

साधारणपणे चंपाषष्ठीनंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वांग्याचे दर (Vangi Bajar Bhav) सर्वोच्च पातळीवर टिकून होते. मात्र, त्यानंतर वांग्याच्या दराला लागलेली उतरती कळा आजतागायत कायम आहे. 29 डिसेंबरला सर्वप्रथम वांग्याच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी अनेक बाजार समित्यांमध्ये वांग्याला कमाल 8000 ते 9600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर आता महिन्याभरानंतर वांग्याच्या दराने कमाल 2000 ते 2500 इतका निच्चांकी दर गाठला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या वांग्याच्या पिकावर केलेला खर्चही त्यांना निघत नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!