Varah Palan Yojana : वराहपालनासाठी मिळते लाखोंचे अनुदान; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक तरुण मुले उच्च शिक्षण घेत, आपल्या ज्ञानाचा वापर शेती किंवा शेतीसंबंधित व्यवसायामध्ये (Varah Palan Yojana) करत आहेत. त्यामुळे आता जर तुम्हाला ही एखाद्या व्यवसायात उतरायचे असेल. तर वराहपालन व्यवसाय तुमच्यासाठी योग्य असणार आहे. वराहपालनातून मांस विक्रीतून मोठी कमाई तर होतेच, याशिवाय डुकराचे मांस आणि त्याच्या कातडीपासून वेगवगेळ्या वस्तू बनवल्या जातात. त्यामुळे आज आपण वराहपालनात नेमक्या काय-काय संधी आहेत. याच पार्श्वभूमीवर वराहपालन व्यवसायासाठी (Varah Palan Yojana) भांडवल कसे उभे करायचे? सरकार किती अनुदान देते? याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळते कर्ज?

शेतकऱ्यांना एका छत्राखाली मांस, बकरीचे दूध, लोकर, अंडी उत्पादन वाढविणे, वैरणीची उपलब्धता वाढविणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेत वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, नाविण्यपुर्ण उपक्रमांस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पशुपालन फार महत्त्वाचे आहे. वराह, बकरी आणि मेंढीपालन यांच्या माध्यमातून शेतकरी अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात. राज्य आणि केंद्र सरकार विविध योजनांमधून पशूसंवर्धनासाठी अनुदान देत आहे. त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वराहपालनासाठी अनुदान निवळू मिळवू शकतात.

काय आहे योजनेचा उद्देश? (Varah Palan Yojana Subsidy Scheme)

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत (Varah Palan Yojana) 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. सन 2021-22 पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारित पुनर्रचना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे.

वराहपालनासाठी किती मिळते अनुदान?

  • 50 मादी आणि 5 नरांसाठी 15 लाख रुपये.
  • 100 मादी आणि 10 नरांसाठी 30 लाख रुपये.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • प्रकल्पात अर्जदाराच्या वाट्याचा पुरावा
  • प्रकल्पात जोडलेल्या शेतकऱ्यांची यादी
  • अर्जदाराचा पत्ता पुरावा
  • शेवटच्या 3 वर्षांचे ऑडिट केलेले आर्थिक विवरण (कंपनीच्या बाबतीत)
  • मागील 3 वर्षांचे आयकर विवरण
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मुख्य प्रवर्तकाचे पॅन/आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र,स्कॅन केलेला फोटो
  • या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र अर्जदारांना www.nlm.udyamimitra.in द्वारे NLM उद्योजकता योजनेसाठी अर्ज करू शकता.
error: Content is protected !!