Vasantdada Sugar Institute Award: वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून ‘ऊस-भूषण’ पुरस्कारांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उस उत्पादनात आणि साखर उद्योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी (Vasantdada Sugar Institute Award) करणारे शेतकरी, कारखाने आणि अधिकाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून  पुरस्कार (Vasantdada Sugar Institute Award) देण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा झाली असून संस्थेमार्फत दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी यासंबंधित माहिती दिली

दरम्यान, विभागानुसार उसभूषण पुरस्कार, राज्यस्तरीय उसभूषण पुरस्कार, सर्वोत्कृष्ठ कामगिरी वैयक्तिक पुरस्कार, उत्कृष्ठ ऊस विकास संवर्धन पुरस्कार, कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार आणि तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी उसभूषण, कर्मचाऱ्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी वैयक्तिक पुरस्कार आणि कारखान्यांसाठी तांत्रिक कार्यक्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी अशा पुरस्कारांची (Vasantdada Sugar Institute Award) घोषणा करण्यात आली आहे. 

पुरस्कार आणि पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची नावे खालीलप्रमाणे (Vasantdada Sugar Institute Award)

मध्य विभाग
१) विजय लोकरे
२) सुनिल काकडे
३) सुरेश आवारे

उत्तरपूर्व विभाग
पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकासाठी शेतकरी पात्र झाले नाही
३) भैरवनाथ सवासे

राज्यस्तरीय उसभूषण पुरस्कार (Vasantdada Sugar Institute Award)
१) कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार – विमल चौगुले (कोल्हापूर)
२) कै. वसंतराव नाईक पुरस्कार – पोपट महाबरे (जुन्नर, पुणे)
३) कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार – अनिकेत बावकर (मुळशी, पुणे)

वैयक्तिक पुरस्कार
१) उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी – दिपा भंडारे (श्रीदत्ता साखर कारखाना शिरोळ, कोल्हापूर)
२) उत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक – दत्तात्रय वारे-चव्हाण (सुंदरराव सोळंके साखर कारखाना, धारूर, बीड)
३) उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर – रविंद्र काकडे (सुधाकरपंत परिचारिक पांडुरंग कारखाना, माळशिरस)
४) उत्कृष्ठ शेती अधिकारी – प्रशांत कणसे (पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली)
५) उत्कृष्ठ चीफ केमिस्ट – किरण पाटील (क्रांती अग्रणी कारखाना, सांगली)
६) उत्कृष्ठ चीफ इंजिनिअर – सुर्यकांत गोडसे (शंकरराव मोहिते पाटील कारखाना, माळशिरस)
७) उत्कृष्ठ कार्यकारी संचालक – राजेंद्र यादव (सोमेश्वर कारखाना, बारामती)

उत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार
१) दक्षिण विभाग – क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना, सांगली
२)मध्य विभाग – विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, म्हाडा, सोलापूर
३) उत्तरपूर्व विभाग – अंकुशराव टोपे समर्थ कारखाना, अंबड, जालना

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार
१) छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल जि. कोल्हापूर

error: Content is protected !!