Vedic Agriculture Study: काशीमध्ये मिळणार एकाच छताखाली मिळणार वेद आणि शेतीचे शिक्षण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशामध्ये शिक्षणाचे (Vedic Agriculture Study) विविध प्रयत्न केले जात असताना यातच आता आणखी एक अनोखा प्रयोग केला जाणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) काशी या धार्मिक नगरीमध्ये कृषी अभ्यासासाठी (Agriculture Education) एक अनोखे केंद्र उघडण्यात येणार आहे. या केंद्रात वेदा सोबतच शेतकर्‍यांना जुन्या पद्धतीनुसार शेतीचे शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी दक्षिणेतील कांची कामकोटी मठाने पुढाकार घेतला आहे. लवकरच काशीमध्ये (Kashi) हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात एकूण 4 प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. यामध्ये वेदांपासून ते शेतीपर्यंतचा अभ्यास (Vedic Agriculture Study) असेल.

काशी येथील कांची कामकोटी मठाचे व्यवस्थापक व्ही एस सुब्रमण्यम मणि यांनी याबाबत माहिती दिली. शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आदेशानुसार हे केंद्र उत्तर आणि दक्षिण भारताच्या संगमासाठी उघडण्यात येत आहे. काशी ते प्रयागराज दरम्यानच्या सनातन धर्म सेवा ग्रामच्या या केंद्राच्या उभारणीचे कामही सुरू झाले आहे. येथे तुम्हाला एकाच छताखाली वेदांच्या ज्ञाना सोबतच कृषीचे शिक्षण (Vedic Agriculture Study) मिळेल. तसेच उपासना पद्धतीपासून ते विधी आणि उपवास आणि सणांचे महत्त्व समजावून सांगितले जाईल.

वी एस सुब्रमण्यम मणि यांनी सांगितले की, या केंद्रात चार प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे. याअंतर्गत पूर्णवेळ आणि अर्धवेळ वेद विद्या, ऋषि आणि शेतीचे शिक्षण (Vedic Agriculture Study) दिले जाणार आहे. आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी शेतीसाठी वापरलेल्या पद्धती (Agriculture Technique) आणि तंत्रांबद्दल माहिती या अभ्यासक्रमात शिकवली जाईल. तसेच या अंतर्गत शेतकरी (Farmer) आणि त्यात रस असणार्‍यांना सेंद्रिय शेतीबद्दल (Organic Farming) शिकवले जाईल. व्ही एस सुब्रमण्यम मणी यांनी पुढे सांगितले की, या केंद्रात ऋषि कृषी व्यतिरिक्त वेदविद्या देखील दोन योजनांतर्गत शिकवली जाईल. पहिली पूर्णवेळ वेदविद्या योजना असेल. या अंतर्गत श्रुती परंपरेतून वेदविद्येचा अभ्यास केला जाईल. यामध्ये पूजा पद्धतीपासून ते कर्मकांडापर्यंतचे संपूर्ण शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय दुसऱ्या अर्धवेळ वेद शिक्षण योजने अंतर्गतही अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये वेदांच्या अभ्यासा सोबत आधुनिक शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे (Vedic Agriculture Study).

error: Content is protected !!