Vegetable Crop Pests: भाजीपाला पिकांवरील वेगवेगळ्या अळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या अळीवर्गीय किडींमुळे भाजीपाला पिकांचे (Vegetable Crop Pests) मोठ्या प्रमाणात नुकसान होतात. या अळींच्या योग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धती फायदेशीर आणि प्रभावी ठरते. या लेखात जाणून घेऊ या वेगवेगळ्या किडी आणि त्यांचे एकात्मिक नियंत्रण उपाय (Vegetable Crop Pests).

पाने पोखरणारी अळी/ नागअळी (Leaf Borer)

ही अळी प्रामुख्याने टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी, वेलवर्गीय भाजीपाला या पिकात आढळते (Vegetable Crop Pests). पानामध्ये शिरून आतील भाग खाते त्यामुळे पानांवर चंदेरी रंगाच्या  नागमोडी वळणाच्या रेषा पडतात.उत्पादनात 20 ते 30 टक्के घट होते.

प्रतिबंधक उपाय

  • पिकाची नियमित पाहणी करावी, कीडग्रस्त रोपांची पाने खुडून नष्ट करावीत
  • 5% निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन (10,000 PPM) 2 मि.लि./लिटर पाणी फवारणी
  • पिवळे चिकट सापळ्यांचा वापर
  • योग्य प्रमाणात खतांचा वापर, सापळा पि‍काची लागवड

जैविक नियंत्रण

  • परोपजीवी मित्र कीटक – ट्रायकोग्रामा बॅक्ट्री
  • बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझीयम अॅनिसोप्ली @ 5 ग्रॅम/लिटर पाणी फवारणी

रासायनिक नियंत्रण 

  • सायॲन्ट्रानिलिप्रोल (10.26 टक्के ओ.डी.) 1.8 मि.लि./लिटर पाणी फवारणी
  • इथिऑन (40%) अधिक सायपरमेथ्रीन (5%) 2.5 मिलि /लिटर पाणी फवारणी

शेंडे व फळ पोखरणारी अळी (Shoot &Fruit Borer)

भाजीपाला पिकातील ही सर्वात हानिकारक कीड टोमॅटो, भेंडी, वांगे यासारख्या फळ भाजीपाला पिकात आढळते. हेलिकोवर्पा आर्मीजेरा या किडीची अळी कोवळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरुन आत शिरते व गर खाते. शेंडे वाळून झाडाची वाढ खुंटते

प्रतिबंधात्मक उपाय

  • पिकांची फेरपालट, भेंडी, वांगे आणि टोमॅटो या वर्गातील पिकांच्या जवळ लागवड टाळावी
  • निंबोळी अर्क (5%) किंवा अझाडीरॅक्टीन (300 PPM) मि.लि./लिटर पाणी फवारणी
  • अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे तसेच एकरी 10 पक्षी थांबे लावावे
  • कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावीत

जैविक नियंत्रण उपाय

  • ट्रायकोग्रामा चिलोनीस प्रजातीचे ट्रायकोकार्ड 4 ते 5 प्रति हेक्टरी
  • अपेंटालीस (कोटेशिया) किंवा ब्रेकॉन @ 20,000 प्रौढ/एकर
  • बिव्हेरिया बॅसियाना (1% WP) 10 ग्रॅम किंवा एचएएनपीव्ही (250 LE) 0.5 मिलि/लिटर पाणी फवारणी

रासायनिक  नियंत्रण उपाय

  • क्लोरपायरीफॉस (20 EC) 1 मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (5 SG) 0.4 ग्रॅम किंवा पायरीप्रोक्झीफेन (5 EC) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (15 EC) (संयुक्त कीटकनाशक) 1 ते 1.2 मि.ली./लिटर पाणी फवारणी

फळमाशी (Fruit Fly)

ही कीड मुख्यत्वे वेलवर्गीय पिके, वांगे, टोमॅटो, यासारख्या पिकांवर आढळते (Vegetable Crop Pests) . अळ्या फळातील गर खातात.या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास ३० ते ४० टक्के फळांचे नुकसान होते

प्रतिबंधात्मक उपाय

  • पीक काढल्यानंतर खोलवर नागरणी, आंतर मशागत करून तणांचे वेळोवेळी नियंत्रण
  • टोमॅटो पिकाजवळ कांदा पिकाची लागवड
  • फळमाशी प्रादुर्भावीत फळे गोळा करून नष्ट करा
  • निंबोळी अर्काची फवारणी

जैविक नियंत्रण उपाय

  • ओपियस फ्लेचेरी परजीवी किटकाचा वापर
  • रक्षक सापळे प्रती एकरी एकर 10 ते 12
  • फुले येण्याच्या वेळी नर क्यूलुअर कामगंध सापळे 5 ते 6 प्रति एकरी

रासायनिक नियंत्रण उपाय

  • फ्लुबेंडीअमाईड (8.33%) + डेल्टामेथरीन (5.56SC) 5 मिली/10 लिटर पाणी
  • प्रोफेनोफोस 40% + साइपरमेथ्रिन 4% EC – 400 मिली प्रति एकर
  • थिएमेथॉक्सम (12.6%) + लैम्ब्डासाइलोथ्रिन (9.5%) – 80 मिली प्रति एकर
  • इंडोक्साकार्ब (14.5% SC)- 160 – 200 मिली प्रति एकर
  • क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% एससी – 60 मिली प्रति एकर

पाने गुंडाळणारी अळी (Leaf Roller)

ही अळी पानकोबी, फुलकोबी या पिकांवर आढळते (Vegetable Crop Pests). या किडींची अळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर असते. अळी पानाची गुंडाळी करते आणि त्यामध्ये आत राहून पानाची पेशी खाते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • नत्र खताचा कमी वापर करावा
  • पिकाची उशिरा लागवड करावी
  • पिकाची नियमित पाहणी करावी

जैविक नियंत्रण उपाय

  • बॅसिलस थुरीनजेन्सीस 0.8 ते 1 किलो/एकर फवारणी
  • बिव्हेरिया बॅसियाना – 5 ग्रॅम/लिटर पाणी, 0.8 ते 1 किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा 8 किलो/एकर जमिनीतून

रासायनिक नियंत्रण उपाय

  • 5% निंबोळी अर्क अथवा सायपरमेथ्रीन (20EC) 4 मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस (36%) 15 मि.ली. किंवा क्विनॉलफॉस (25 EC) 20 मि.ली./10 लिटर पाणी फवारणी

चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग/पाकोळी (Diamond Back Moth)

कोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा या पिकात अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात.

प्रतिबंधात्मक उपाय

  • शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण बांधा 
  • एकरी 5 फेरोमोन सापळे (झायलो ल्यूर) लावा
  • कोबीच्या 20 ते 22 ओळीनंतर 2 ओळी मोहरीच्या (सापळा पीक )

जैविक नियंत्रण उपाय

  • मित्र कीटक कोटेशिया प्लुटेला या परजीवी अळीचे संवर्धन
  • बॅसिलस थुरिंजनेसिस) 1 ग्रॅम/लिटर पाणी फवारणी
  • निंबोळी अर्क 5% किंवा   अझाडिरॅक्‍टीन (300 PPM) 5 मि.लि/लिटर पाणी फवारणी
  • ट्रायकोग्रामा – ट्रायकोकार्ड्स 2 ते 4 प्रति एकर

रासायनिक नियंत्रण उपाय

  • क्लोरपायरीफॉस (20%EC) 40 मिली किंवा नोव्हालुरोन (10%EC) 15 मिली किंवा स्पिनोसाड (2.50SC) 12 मिली/ दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी (Vegetable Crop pests).
error: Content is protected !!