Vegetable Diseases: असे करा भाजीपाला पिकांवरील करपा आणि भुरी रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: करपा आणि भुरी रोग (Vegetable Diseases) हे प्रामुख्याने वांगे, भेंडी, मिरची, टोमॅटो, कोबी, फुलकोबी, वेलवर्गीय पिके या सर्व भाजीपाला पिकांवर (Vegetable Diseases) आढळतात. या रोगाचे एकात्मिक नियंत्रण जाणून घेऊ या.  

पानावरील करपा (Anthracnose)

हा रोग (Vegetable Diseases) दोन प्रकारचा आहे लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट), उशिरा येणारा करपा (लेट ब्लाइट)

लवकर येणारा करपा (Vegetable Diseases) अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार, तपकिरी ते काळपट रंगाचे ठिपके येतात. प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळून मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात. पानाप्रमाणे खोडावरदेखील गर्द तपकिरी वलयांकित डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात.

उशिरा येणारा करपा फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या बुरशीमुळे पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या आणि लाल फळांवर हा करपा आढळून येतो. सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड,पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात. अती आर्द्र हवामानात पानाच्या वरती  आणि डागाच्या कडेवर पांढरी बुरशीची वाढ होते.

प्रतिबंधक उपाय

  • जमिनीचा खोल नांगरट करावी.
  • पिकाची फेरपालट करावी, एकाच वर्गातील पिकांची लागवड करू नये.
  • लागवडीसाठी रोगविरहित आणि प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा.
  • कार्बेन्डाझिम 2.5 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • वेलवर्गीय पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी, म्हणजे वेलीचा संपर्क जमिनीशी येणार नाही याची

नियंत्रण उपाय

मॅन्कोझेब 2.5 ते 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 2.5 ते 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.

उशिरा येणारा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

भुरी रोग (Powdery Mildew)

हा रोग (Vegetable Diseases) ईरिसीफी सिचोरासीयारम या बुरशीमुळे होतो. रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानापासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठीसारखी पांढरी बुरशी वाढते. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात. हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.

प्रतिबंधक उपाय

  • भुरी रोगास सहनशील वाणांची निवड करावी. उदा. फुले शुभांगी (काकडी), फुले मुक्ता (मिरची)
  • पीक लागवडीपूर्वी जमिनीतील अगोदरच्या पिकांचे अवशेष पूर्णपणे नष्ट करावे तसेच पिकांची फेरपालट करावी.
  • पिकास पोटॅश अन्नद्रव्य कमी पडल्यास पीक भुरी रोगाला बळी पडते त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करून पोटॅश आणि कॅल्शिअम युक्त खतांचा वापर वाढवावा जेणेकरून पीक भुरी आणि इतर रोगांना बळी पडणार नाही.
  • प्लॉट मध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी शक्य असल्यास तुषार सिंचनाचा वापर करावा.

जैविक नियंत्रण उपाय (Vegetable Diseases)

  • अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस @ 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा पिकात फवारणी करावी.

अँपेलोमायसेस क्विस्क्वालिस ची बुरशी भुरी रोगाच्या बुरशीवर उपजीविका करते त्यामुळे रोग नियंत्रणास तसेच प्रतिबंधास मदत होते.

रासायनिक नियंत्रण

भुरी रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी

  • डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ 0.5 ते 1 ग्रॅम/मिलि किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 2 मिलि प्रति लिटर पाणी फवारणी करावी.  
  • कोबी पिकासाठी – विद्राव्य गंधक (80 टक्के) 2.5 ग्रॅम किंवा डिनोकॅप 1 मि.लि. प्रति लिटर पाणी फवारणी

आवश्यकतेनुसार 8 – 10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक (Vegetable Diseases) बदलून फवारणी करावी .

error: Content is protected !!