Vegetable Farming : ‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला सुविधा केंद्र, जूनमध्ये होणार खुले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फळे व भाजीपाल्याची (Vegetable Farming) साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड परिसरात हे सुविधा केंद्र उभारले आहे. त्यामुळे आता लवकरच जून महिन्यापासून या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Vegetable Farming) हे केंद्र खुले होणार आहे.

केंद्रात मिळणार ‘या’ सुविधा (Vegetable Farming)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात विशेषतः पाचोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड होते. या पार्श्वभूमीवर मोसंबी निर्यात सुविधा केंद्र पाचोड येथे असावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीची दखल घेत सरकारमार्फत सुमारे दोन वर्षांपूर्वी पाचोड येथील उपबाजार समितीच्या आवारात दोन एकरवर फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला होता. फळे व भाजीपाला सुविधा हाताळणी केंद्रामुळे काढणी पश्चात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी करणे व त्याची साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार मालाची मुल्यवृध्दी करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी होणार आहे.

जूनपासून शेतकऱ्यांसाठी होणार सुरु

दरम्यान फळ व भाजीपालानिर्यातीमध्ये राज्याचा वाटा मोठा आहे. म्ह्णूनच आगामी काळात या सुविधा केंद्रामुळे निर्यातक्षमता वाढेल, शेतकऱ्यांचा विश्वासही वाढेल. तसेच जागतिक बाजारपेठेत चांगला व दर्जेदार फळे व भाजीपाला निर्यात होण्यास मदत होणार आहे. यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँक आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने (मॅगनेट) प्रकल्पांसाठी 13 कोटी 24 लाख 40 हजार रुपये निधी उपलब्ध केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे असून, जूनपासून हे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पणन महासंघाने म्हटले आहे.

या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्रामध्ये ग्रेडिंग सेंटर, प्री कुलिंग, कोल्ड स्टोअरेज, पॅक हाऊस अशा सर्व सुविधा असणार आहे. ग्रेडिंग लाइनवर प्रति तास 15 मेट्रिक टन क्षमता असेल. प्री कुलिंगदरम्यान शेतमालाचे तापमान करण्यासाठी 6 मेट्रिक टन प्रति बेंच सुविधा (सहा तास प्रति बॅच) उपलब्ध आहे. तर 100 मेट्रिक टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज, शेतमालाचे ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्यासाठी 8 हजार 823 चौरस फुटाचा हॉल, आणि यंत्र सामग्री आणि अन्य आवश्यक सुविधा यामध्ये 60 मेट्रिक टन क्षमतेचा भुईकाटा, कार्यालय, स्टोअर, संरक्षक भित असलेली आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

error: Content is protected !!