Vegetable Rate : मटणापेक्षा महाग आहे ‘ही’ भाजी, 1200 रुपये किलोचा दर; जाणून घ्या अधिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetable Rate : सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक लोकांचे मटण खाण्याचे प्रमाण कमी झाले आ. हे पावसाळ्यात मटन खाल्ल्यामुळे अनेक आजार उद्भवतात असे म्हटले जाते त्यामुळे मटण खाणे शक्यतो टाळावे असा देखील आरोग्य तज्ञ सल्ला देत असतात. त्यामुळे मटणाला पर्याय म्हणून अनेक जण मशरूमची भाजी खातात. मात्र आता या मशरूमच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आहेत. त्याचं कारण असं की, मशरूमची भाजी खाण्यासाठी खवय्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

आरोग्यासाठी पोषक असणारी मशरूमची भाजी अनेक लोक आवडीने खात असतात. मात्र आता ही भाजी खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मटणापेक्षा दुप्पट किमतीने जंगली मशरूम विक्री केली जात आहे. एक किलो मशरुमची किंमत एकूण 1200 रुपये इतकी आहे. त्यामुळे याची किंमत ऐकून तर अनेक जणांना चांगला धक्का बसला आहे.

मशरूमला मोठी मागणी

गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असून त्या प्रमाणात अधिक पाऊस पडतो यावेळी. रानातल्या मशरूमची कुठेही लागवड केली जात नाही हे मशरूम जंगलामध्ये उगवून आले असतात. यावेळी त्या ठिकाणचे गावकरी जंगलात जाऊन मशरूम आणतात आणि ते विक्रीसाठी बाजारात नेतात सध्या मशरूमला बाजारामध्ये खूप मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे.

गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मधील जंगलांमध्ये मशरूम मोठ्या प्रमाणात आढळून येतात. श्रावण महिन्यात अनेक जणमांसाहार करत नाही त्यामुळे मटणाला पर्याय म्हणून ही भाजी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र जंगली मशरूमला जास्त दर मिळत असल्याने त्याची सध्या सगळीकडे चर्चा आह. किंमत जास्त असल्याने मशरूम उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होत आहे. त्या ठिकाणचे गावकरी जंगलात जाऊन मशरूम विक्रीसाठी आणत आहेत

error: Content is protected !!