Vihir Subsidy : विहीर खोदण्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान; आता शेतातूनच करा अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून चार लाखांपर्यंत अनुदान (Vihir Subsidy) दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. सध्या सरकारकडून अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना, विहीर खोदणाऱ्यांची संख्या मात्र वाढत नव्हती. म्हणून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 15 प्रस्ताव ( (Vihir Subsidy) मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

यावर्षी राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांचा विहीर खोदण्यासाठी ओढा असणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांना अनुदान (Vihir Subsidy) मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. पाच वर्षांत किमान दहा लाख शेतकऱ्यांना नव्या विहीरींना अनुदान मिळवून द्यावे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

योजनेसाठीची पात्रता (Vihir Subsidy Up To Four Lakhs For Farmers)

 • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.20 हेक्टर व कमाल 6 हेक्टर मर्यादेत जमीन असावी.
 • शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
 • शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डसोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
 • प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

 • विहिरीसाठी तीन टप्प्यांत अनुदान मिळते.
 • खोदाईपूर्वी तसेच खोदाईदरम्यान 30 ते 60 टक्के झालेली असताना व शेवटी खोदाई पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते.
 • परंतु गैरव्यवहार टाळण्यासाठी या टप्प्याचे जिओ टॅगिंग’ करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

कुठे कराल अर्ज?

 • शेतकरी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विहीर अनुदान अर्ज करू शकता.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
 • ग्रामपंचायत अर्जाची पडताळणी करून मंजुरी देईल.
 • मंजुरी मिळाल्यानंतर विहीर खोदाई सुरू होईल.

ऑनलाइन अर्जाचीही सुविधा

विहीर खोदाई अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधी केवळ ग्रामपंचायतीकडे संपर्क करण्याचा पर्याय दिलेला होता. परंतु, आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘गुगल प्ले स्टोअर’ मध्ये महा ईजीएस हार्टिकल्चर या अॅपची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विहिरीसाठी शेतकरी आपल्या शिवारातूनही ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. (महा ईजीएस हार्टिकल्चर अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक: https://shorturl.at/jqwG1)

error: Content is protected !!