Viksit Bharat : पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यासोबत संभाषण; वाचा काय झाली दोघांमध्ये चर्चा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प (Viksit Bharat) यात्रेची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी केरळ राज्यातील कोझिकोड येथील शेतकरी धर्मराजन यांच्याशी संवाद साधत त्यांना मिळालेल्या शेतीविषयक सरकारी योजनांच्या लाभांची माहिती विचारली. यावेळी शेतकरी धर्मराजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय संभाषण (Viksit Bharat) झाले. वाचा तुम्हीच…

जीवन प्रणालीत आमूलाग्र बदल (Viksit Bharat PM Modi Talks With Farmer)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलताना धर्मराजन यांनी सांगितले की, त्यांना केंद्र सरकारच्या केसीसी कर्ज योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, सुकन्या समृद्धी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना या योजनांचा लाभ मिळत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी धर्मराजन यांनी आपल्या शेतात केळी लागवड केली आहे. केळीच्या शेतीसाठी त्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभ मिळत आहे. ज्यामुळे त्यांच्या जीवन प्रणालीत आमूलाग्र बदल झाल्याचे मोदी यांच्यासोबत बोलताना म्हटले आहे.

भांडवल गुंतवणूकीस हातभार

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या तुलनेत या योजनांच्या लाभामुळे आपणास काय फायदा झाला. असे या शेतकऱ्याला विचारले. यावर उत्तर देताना धर्मराजन म्हणाले, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अभूतपूर्व योजना असून, त्याद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. इतकेच नाही तर बियाणे, खाद, कृषी उपकरणे आदींच्या खरेदीसाठी मोठी मदत होत आहे. शेतकरी या आर्थिक मदतीचा वापर शेतीत भांडवल गुंतवणूक करण्यासाठी करत असल्याचेही धर्मराजन यांनी मोदी यांच्यासोबत बोलताना म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहानुभूतीपूर्वक या शेतकऱ्याच्या परिवाराबाबत चौकशी केली. यावेळी बोलताना धर्मराजन म्हणाले, त्यांच्या दोन्ही मुलींना सुशिक्षित करण्यासाठी सरकारी योजनांचा विशेष लाभ मिळत आहे. सरकारच्या योजनेचा लाभ मिळवत मुलींच्या लग्नासाठी बचत केल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आपल्या जीवनमानात झालेल्या सुधारणेमुळे शेतकरी धर्मराजन यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे. ते एक प्रगतिशील शेतकरी असून, त्यांनी आपल्या मुलींना सुशिक्षित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी धर्मराजन यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रेरणास्रोत असल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!