Voice Control Robot: शेतीच्या कामासाठी वापरा व्हॉइस कंट्रोल रोबोट! कोल्हापूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद  संशोधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भारतीय शेतीत यांत्रिकीकरण (Voice Control Robot) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीचे काम सहज कसे करता येईल यासाठी देशभरात वेगवेगळे संशोधन सुरू असते. असेच एक कौतुकास्पद यशस्वी संशोधन कोल्हापूर न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी मदत करणारा एक नवीन व्हॉइस कंट्रोल रोबोट (Voice Control Robot) मोठ्या तयार केला आहे.

हा रोबोट शेतकऱ्यांना शेतीकामात मोठा सहाय्यक ठरणार आहे. यामुळे शेतीचा व्यवसाय हा आणखी सोपा होईल अशी आशा आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र चर्चा होत आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सध्या शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे आव्हान आहे. यामध्ये मजूरटंचाई हे देखील एक महत्त्वाचे आणि खूपच मोठे आव्हान आहे. पण, मजूर टंचाई दूर करण्यासाठी हे संशोधन कामी येणार आहे. बिया पेरणी, खुरपणी आणि कीटकनाशकाची फवारणी अशी कामे करण्यासाठी हा रोबोट (Voice Control Robot) मोठ्या उपयुक्त ठरणार अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्हाइस कंट्रोल अॅग्रिकल्चर रोबोट तर तयार केलाच आहे शिवाय दिव्यांग, अपंग व्यक्तींना अर्थातच फिजिकली हॅन्डिकॅप्ड व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारी स्मार्ट व्हीलचेअर (Smart Wheel Chair) सुद्धा तयार केली आहे. त्यांचे संशोधन अपंग व्यक्तींसाठी तथा शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचे ठरणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे.

ही व्हीलचेअर दिव्यांग व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेउन जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.  यावर बसल्यानंतर दिव्यांग व्यक्तीने डोके पुढे वाकवल्यानंतर ती व्हीलचेअर पुढे, तर डोके मागे वाकवल्यानंतर मागे जाणार आहे. डाव्या बाजूला मान वाकवल्यानंतर त्या दिशेने आणि उजव्या बाजूला केल्या तर त्या बाजूला व्हीलचेअर जाणार आहे. निश्चितच या व्हीलचेअरचा दिव्यांग व्यक्तींना मोठा फायदा मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि अपंग व्यक्तींच्या हिताच्या संशोधनाची दखल राज्य शासनाने (Maharashtra Government) देखील घेतली आहे. राज्य शासन आता या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपसाठी बळ देणार अशी माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे (Voice Control Robot).

error: Content is protected !!