VST Tractors : व्हीएसटी कंपनीचा हा छोटा ट्रॅक्टर, शेतीची कामे करेल सोपी; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : व्हीएसटी ट्रॅक्टर (VST Tractors) कंपनी ही नावाजलेली कंपनी असून, कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी विविध क्षमतेचे ट्रॅक्टर निर्माण करण्यात आले आहे. जर तुमचे शेतीचे क्षेत्र हे कमी असेल किंवा मग तुम्ही आपल्या फळबागेसाठी एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर छोटी शेती आणि फळबागेच्या मशागतीसह औषध फवारणीसाठी व्हीएसटी कंपनीचा ‘VST 918 4WD’ हा छोटा ट्रॅक्टर तुमच्यासाठी सर्वोत्तम ट्रॅक्टर ठरणार आहे. विशेष म्हणजे या छोटा ट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतीमध्ये पेरणी, मशागतीपासून-काढणी-ते बाजारात विक्रीसाठी नेईपर्यंत सर्व कामे करू शकतात. आज आपण व्हीएसटी कंपनीच्या अत्याधुनिक ‘व्हीएसटी 918 4 डब्लूडी’ या ट्रॅक्टरबद्दल (VST Tractors) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे या ट्रॅक्टरची विशेषतः? (VST Tractors Make Farming Work Easy)

व्हीएसटी कंपनी ‘व्हीएसटी 918 4 डब्लूडी’ हा छोटा ट्रॅक्टर तुम्हाला 900 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरला 4 स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. जे 18.5 एचपी पॉवरसह 54 एनएम टॉर्क जनरेट करते. या छोट्या ट्रॅक्टरला ड्राय टाईप एयर फिल्टर देण्यात आला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर कमीत कमी 15.8 एचपी पीटीओ पॉवर जनरेट करण्यासह 2700 आरपीएमची निर्मिती करतो. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 750 किलो वजन उचलण्याची क्षमता दिलेली असून, त्याचे वजन 840 किलोग्रॅम इतके आहे. व्हीएसटी कंपनीचा ‘व्हीएसटी 918 4 डब्लूडी’ हा छोटा ट्रॅक्टर 2420 एमएम लांबी, 940, 1090 एमएम रुंदी आणि 1320 एमएम उंचीसह 1420 एमएम व्हीलबेस मध्ये तयार करण्यात आला आहे. त्याला कंपनीने 215 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे.

काय आहेत फीचर्स?

  • व्हीएसटी कंपनीने ‘व्हीएस 918 4 डब्लूडी’ या छोट्या ट्रॅक्टरला (VST Tractors) मॅन्युअल स्टीयरिंग दिलेली आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीकडून पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • हा छोटा ट्रॅक्टर स्लाडिंग/कॉन्स्टन्ट मेश टाइप ट्रांसमिशनमध्ये येतो
  • कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्युअल पीटीओ टाइप पावर टेकऑफसह येतो. जो 540 & 540E आरपीएमची निर्मिती करतो.
  • ‘व्हीएसटी 918 4 डब्लूडी’ हा ट्रॅक्टर 4WD ड्राइवसह येतो.
  • या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 5.00 X 12 आकारात आणि मागील बाजूस 8.00 X 18 आकारात टायर देण्यात आले आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 16.32 किमी प्रति तास तर मागील बाजूस 8.06 किमी प्रति तास वेग दिलेला आहे.

किती आहे किंमत?

व्हीएसटी कंपनीने ‘व्हीएस 918 4 डब्लूडी’ या आपल्या छोट्या ट्रॅक्टरची किंमत 4.65 लाख रुपये इतकी निर्धारित केलेली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राहू शकते. त्यामुळे तुम्ही देखील एखादा लहान ट्रॅक्टर घेणार असाल तर हा ट्रॅक्टर तुम्हाला स्वस्तात मस्त ट्रॅक्टर म्हणून उपलब्ध आहे.

error: Content is protected !!