हॅलो कृषी ऑनलाईन : ‘व्हीएसटी ट्रॅक्टर्स’ या ट्रॅक्टर कंपनीचे (VST Tractors) 17 ते 50 एचपी रेंजपर्यंतचे ट्रॅक्टर देशातील शेतकऱ्यांच्या मनावर कायमच राज्य करत आहे. फळ बागकाम आणि औषध फवारणीच्या वापरामुळे कंपनीचे मिनी ट्रॅक्टर (VST Tractors) शेतकऱ्यांना खूप जवळचे वाटतात. तर शेती क्षेत्र अधिक असलेल्या शेतकऱ्यांना अधिक रेंजचे ट्रॅक्टर भुरळ घालतात. मात्र, आता गेल्या नोव्हेंबर महिन्यात ‘व्हीएसटी’ ट्रॅक्टरच्या विक्रीत 11.9 टक्क्यांनी घसरण झाल्याचे समोर आले आहे.
‘व्हीएसटी’ ट्रॅक्टरची (VST Tractors) आपल्या इंजिनच्या शक्ती आणि दमदार कामगिरीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात ‘व्हीएसटी’च्या 1 हजार 801 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ‘व्हीएसटी’ने 2 हजार 045 ट्रॅक्टर विक्री केले होते. मात्र असे असले तरी वार्षिक विचार करता ‘व्हीएसटी’ ट्रॅक्टरच्या वार्षिक विक्रीत 6.9 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. असे व्हीएसटी ट्रेलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीने बीएसईकडे नोव्हेंबर महिन्यातील विक्रीची माहितीची नोंद करताना म्हटले आहे. नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत व्हीएसटी’ने आपल्या 22 हजार 875 ट्रॅक्टरची वार्षिक विक्री केली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 21 हजार 393 ट्रॅक्टर्स इतकी नोंदवली गेली होती. अर्थात ‘व्हीएसटी’ ट्रॅक्टरची वार्षिक विक्री 6.9 टक्क्यांनी वाढली आहे.
1968 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत (VST Tractors November 2023 Sale)
व्हीएसटी ट्रॅक्टरच्या अधिकृत वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार व्हीएसटी ट्रेलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 1967 मध्ये व्हीएसटी ग्रुप ऑफ कंपन्यांनी संयुक्तपणे केली होती. यामध्ये कंपनीचा Mitsubishi Heavy Industries Ltd (MHI) आणि Mitsubishi Shoji Kaisha, Japan सोबत संयुक्त उपक्रम करार आहे. त्यानंतर व्हीएसटी ट्रेलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडची ऑगस्ट 1968 मध्ये स्वतंत्रपणे स्थापना झाली आहे. कंपनीचे सध्या भारतीय बाजारात 17 ते 50 एचपी रेंजपर्यंतचे ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत. जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात.