VST Tractors : फळबाग शेतकरी, छोट्या शेतकऱ्यांचा सम्राट ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसाठी ट्रॅक्टरचा (VST Tractors) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अर्थात सध्याच्या घडीला काही शेतकऱ्यांकडे गरजेनुसार दोन किंवा तीन ट्रॅक्टर देखील आढळतात. त्यामागे कारणही तसेच असून, फळबाग शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढतो आहे. अशावेळी मोठा ट्रॅक्टर बागेत वापरणे अशक्य असते. ज्यामुळे कमी कालावधीत मोठया क्षेत्रावरील बागांना औषध फवारणी करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळे आता तुम्ही देखील असाच एखादा छोट्या ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर व्हीएसटी कंपनीचा ‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ सम्राट हा छोटा ट्रॅक्टर (VST Tractors) तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो.

‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ सम्राट ट्रॅक्टरबद्दल (VST Tractors For Orchard Farmers)

‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ सम्राट हा छोटा ट्रॅक्टर (VST Tractors) शेतकऱ्यांना 746 सीसी क्षमतेसह सिंगल सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. ज्याला कंपनीने वॉटर कुलिंग इंजिन दिले आहे. ‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ हा ट्रॅक्टर 17 एचपीचा असून, तो 47 एनएम टॉर्क जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला वेट टाईप एयर फिल्टर दिलेला आहे. व्हीएसटीचा हा छोटा ट्रॅक्टर कमीत कमी 13 एचपी पीटीओ पॉवरसह 2800 आरपीएमची निर्मिती करतो.

कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 750 किलोग्रॅम इतकी वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. याशिवाय त्याला कंपनीकडून 31 किलोमीटर प्रतितास इतका वेग देण्यात आला आहे. ज्यामुळे तो छोटेखानी मालवाहतुकीसाठी देखील उत्तम ठरतो. या ट्रॅक्टरचे एकूण वजन हे 800 किलोग्रॅम इतके आहे. या ट्रॅक्टरला 1460 एमएम व्हीलबेसमध्ये तयार करण्यात आले असून, त्याचा ग्राउंड क्लीयरन्स 275 एमएम इतका ठेवण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

  • कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला मेकॅनिकल टाइप स्टीयरिंग दिले आहे.
  • या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • व्हीएसटीच्या या छोट्या ट्रॅक्टरला डायाफ्राम प्रकारचा क्लच देण्यात आला आहे.
  • या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला कॉन्स्टन्ट मेश टाइप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • ‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ सम्राट या ट्रॅक्टरला कंपनीने ऑइल इमर्जड डिस्क ब्रेक्स दिलेले आहे.
  • याशिवाय कंपनीने आपल्या छोट्या ट्रॅक्टरला 18 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे.
  • व्हीएसटीचा हा छोटा ट्रॅक्टर 2 डब्लूडी ड्राइवसह येतो.
  • यामध्ये तुम्हाला पुढील बाजूस 5.00 x 15 आकारात तर मागील बाजूस 9.5 x 18 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

कंपनीने ‘व्हीएसटी एमटी 171 डीआय’ सम्राट या ट्रॅक्टरची (VST Tractors) किंमत भारतीय शेतकऱ्यांचा विचार करून निर्धारीत केली आहे. प्रामुख्याने संपूर्ण देशपातळीवर या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 2.88 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे ज्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदल दिसून येऊ शकतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला एकूण 2 वर्षांची वॉरंटी दिली आहे. सध्या शेतीत बैलांची संख्या घटली आहे. ज्यामुळे शेतीमध्ये पावसाळ्यात मशागतीची कामे करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर खूप उपयुक्त ठरतात.

error: Content is protected !!