हॅलो कृषी ऑनलाईन : देशात प्रति शेतकरी जमिनीचे प्रमाण काम होत (VST Tractors) चालले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बैलांच्या किमती वाढल्याने बैलजोडी ठेवणेही परवडत नाही. त्यातच जमीन थोडी असल्यास त्यांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन व्हीएसटी ट्रॅक्टर कंपनीने ‘Vst शक्ती MT 932DI’ ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. या ट्रॅक्टरची विशेषतः म्हणजे त्याने कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले असून, त्याला (VST Tractors) देशभरातील लहान शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे.
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टरबद्दल (VST Tractors For Small Farmers)
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर (VST Tractors) हा केवळ ट्रॅक्टर नसून, लहान शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा आहे. शेतीसोबत माल बाजारात वाहतूक करण्यासाठी तो शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरतो. शेतकऱ्यांना भाडोत्री वाहन लावून मालवाहतूक करताना, शेतात मशागत करताना अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र, Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टर हा शेतीची कामे करण्यासोबतच वाहतुकीची फवारणीची कामे करत असल्याने तो शेतकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. मिनी ट्रॅक्टर हा देखील काही शेतकऱ्यांना खर्चिक ठरू शकतो. याचा विचार करून कंपनीकडू सूक्ष्म ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
Vst शक्ती MT 932DI ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
- या ट्रॅक्टरची निवड करताना आपले क्षेत्र आणि गरजा लक्षात घेऊन निवड करावी.
- सर्वोत्कृष्ट जागतिक तंत्रज्ञान आणि सुविधा वापरून या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
- 2021 मध्ये या ट्रॅक्टरने त्याच्या अत्याधुनिक नवकल्पनांसाठी अपोलो फार्म पॉवर पुरस्कार जिंकला आहे.
- हा ट्रॅक्टर अधिक कार्यक्षम असून, त्याला कंपनीने 30 HP पावरसह चार-सिलेंडर इंजिन दिले आहे.
- या ट्रॅक्टरला कंपनीने 9F आणि 3R गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
- याशिवाय Dual Plate Clutch देण्यात आला आहे.
- Vst शक्ती MT 932DI हा ट्रॅक्टर 1250 क्षमतेचे वजन उचलू शकतो.
- त्याला कंपनीकडून पॉवर स्टीयरिंग देण्यात आली असल्याने ती चालकाला आरामदायी अनुभव प्रदान करते.
- हायड्रॉलिकद्वारे उचलण्याची क्षमता असल्याने, जवळजवळ सर्व उपकरणे तो उचलू शकतो.
- कंपनीने आपल्या या ट्रॅक्टर किंमत 5.40 ते 5.70 लाख रुपये निश्चित केली आहे.