Warehouse In Village : गावागावात सरकारचे गोदाम; शेतकऱ्यांना साठवता येईल शेतमाल; वाचा…जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ‘गाव तिथे गोदाम’ (Warehouse In Village) ही योजना राबविली जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल किंवा प्रक्रिया केलेला शेतीमाल सरकारी गोदामांमध्ये साठवता येणार आहे. शेतमालाचे दर घसरलेले असताना, शेतकऱ्यांना आपला शेतमाल या गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल. याउलट दरवाढ झाल्यानंतर शेतकरी आपल्याला हवा तेव्हा स्वतःचा माल बाहेर विक्रीसाठी काढू शकतात. या योजनेच्या प्रारुपासाठी समिती स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्याबाबतचा जीआर सरकारकडून (Warehouse In Village) जारी करण्यात आला आहे.

काय आहे ‘ही’ योजना? (Warehouse In Village For Farmers)

शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य साठवण्यासाठी ‘ही’ योजना राबवली जात आहे. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आपला काढून आणलेला शेतमाल घरात साठविण्यासाठी जागा नाही किंवा घरात जास्त दिवस ठेवता येत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना धान्य व शेतमाल साठवण्याची अडचण असते. हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने ‘गाव तिथे गोदाम’ ही योजना सुरु केली आहे. काही शेतकरी साठवणूक व्यवस्था नसल्याने शेतातून काढून आणलेला माल थेट बाजारात विक्रीला नेतात. ज्यामुळे संबंधित शेतमालाचे किंवा धान्यांचे दर घसरलेले असतील तर शेतकऱ्यांना नुकसान होते. मात्र सरकारच्या गोदामांमध्ये धान्य साठवणुकीच्या योजनेमुळे शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला शेतमाल विक्री करू शकणार आहे.

योजनेसाठी समिती गठीत होणार

“गाव तिथे गोदाम” या योजनेच्या अभ्यास समितीच्या अहवालातील सर्वंकष मुद्दे विचारात घेऊन ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा जीआर आज राज्य सरकारने जारी केला आहे. त्यानुसार एक समिती गठीत करण्यात आली असून, या समितीचे अध्यक्ष पणन महासंघाचे सह सचिव असणार आहे. तर सदस्य म्हणून वित्त विभातील अवर सचिव, नियोजन विभागातील अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील अवर सचिव, पुणे पणन संचालनालयाचे सह संचालक, मुंबई, महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे सरव्यवस्थापक, पुणे राज्य वखार महामंडळाचे सरव्यवस्थापकीय संचालक, राज्य पणन सल्लागार, गाव तिथे गोदामचे संयोजक तसेच कक्ष अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर… https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202401151456050502……pdf

error: Content is protected !!