Watermelon Cultivation: कलिंगड लागवड करायची आहे? जाणून घ्या सुधारित पद्धत  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा सुरू झाला की लाल भडक आणि चवीला गोड अशा कलिंगडाची (Watermelon Cultivation) मागणी वाढते. कमी कालावधीत येणारे हे पीक शेतकर्‍यांना चांगला नफा मिळवून देते. फेब्रुवारीचा महिना कलिंगड लागवडीसाठी महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे शेतकरी जर कलिंगड लागवड (Watermelon Cultivation) करायचा विचार करत असतील तर सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना नक्कीच गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळेल.

जमीन (Soil for Watermelon Cultivation)

मध्यम काळी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, 6.5 ते 7 सामू असणारी, नदीकाठची पोयटा रेतीमिश्रित जमीन या पिकास योग्य ठरते. चुनखडीयुक्त, कार्बोनेट व बायकार्बोनेट विद्राव्य क्षार असलेली जमीन कलिंगड लागवडीसाठी योग्य नाही. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून प्रति हेक्टरी 15-20 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून दोन वखराच्या पाळ्या द्याव्यात.

लागवड पद्धती (Sowing method of Watermelon Cultivation)

कलिंगडाची लागवड सरी पद्धतीने, आळे पद्धतीने किंवा गादी वाफा पद्धतीने करता येते. सरी पद्धतीने लागवड केल्यास 2 मीटर अंतरावर सऱ्या पाडून वाफ्यावर 0.5 मीटर अंतरावर बिया लावाव्यात.

आळे पद्धतीत ठराविक अंतरावर आळे करून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ४ ते ५ बिया टोकाव्यात.    

रुंद गादीवाफा पद्धतीने लागवड करताना 3 ते 4 मीटर अंतरावर सरी पाडावी. सरीच्या दोन्ही बाजूंना 1 ते 1.5 मीटरवर 3 ते 4 बिया लावाव्यात.

जाती (Improved Watermelon Varieties)

सध्या राज्यातील येऊ पाहणाऱ्या दुष्काळाची परिस्थिती बघता लागवडीसाठी कमी पाण्यावर व अल्प कालावधीत येणाऱ्या जातींची निवड योग्य ठरेल. यासाठी शेतकर्‍यांनी शुगर बेबी, मधू, अर्का माणिक, मिलन, अमृत, अर्काज्योती, अर्का राजहंस, अर्का जीत या जातींची निवड करावी. 

मल्चिंग पेपरचा वापर (Use of Mulching paper)

मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी गादीवाफा एकसमान करून घ्यावा. मधोमध ठिबकची लॅटरल टाकावी. गादीवाफ्यावर 4 फूट रुंदीचा 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा मल्चिंग पेपर टाकावा.

पेपर गादीवाफ्यावर समांतर राहील व ढिला होणार नाही याची काळजी घ्यावी. एक एकरासाठी साधारण 5 ते 6 किलो पेपर लागतो. लागवडीच्या एक दिवस आधी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस 15 सेंमी अंतरावर रोपे लावण्यासाठी पेपरला छिद्रे पाडून घ्यावीत.

दोन रोपांमधील अंतर 2 फूट ठेवावे. त्यानंतर गादीवाफा ठिबक सिंचनाच्या साह्याने ओला करून घ्यावा. छिद्रे पाडलेल्या ठिकाणी योग्य वाढीच्या रोपांची लागवड करावी.

लागवडीच्या टोकणपद्धती मध्ये  बियाण्यांची उगवणक्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. पर्यायाने खर्चात वाढ होते. त्यामुळे शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी.

बियाणे आणि बीजप्रक्रिया (Seeds and Seed Treatment)

प्रती हेक्टरी साधारणत: सरळ वाणाचे 2.5 ते 3 किलो, तर संकरित जातींचे 750-875 ग्रॅम बी पुरेसे होते. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिया कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लीटर पाणी या द्रावणात 3 तास भिजवून घ्याव्यात. बियांचे आवरण टणक असल्यामुळे उगवण क्षमता वाढवण्यासाठी त्याच बिया नंतर ओलसर पोत्याच्या गुंडाळीत 12 तास ठेऊन नंतर लागवडीसाठी वापराव्यात.

खत व्यवस्थापन (Fertilize Management)

कलिंगड पिकास प्रति हेक्टरी 50:50:50 किलो नत्र, स्फुरद व पालाश गरजेचे असते. त्यातील अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा लागवडीच्या अगोदर वाफे बनवताना द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा लागवडीनंतर 1, 1.5  आणि 2 महिन्याने तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावी.

विद्राव्य खत व्यवस्थापन (Soluble fertilizer Management)

  • पीक 15 दिवसाचे झाले असता 19:19:19 @ 2-3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. 
  • पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड नं. 2 ची 2.5- 3 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत (Watermelon Cultivation) असताना 00:52:34 ची 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
  • बोरॉनच्या कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे फुलोरा अवस्थेत 00:52:34 सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी केल्यास पिकांना बोरॉनची उपलब्धता होते. 
  • फळ पोसत असताना 13:00:45 या विद्राव्य खताची 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी

फुलगळ आणि फळगळ व्यवस्थापन

अनियमित सिंचन व पाण्याची अयोग्य मात्रा यामुळे फुले व फळांची गळ होऊ शकते, तसेच फळे सुद्धा तडकतात. हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. फळ लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये (Watermelon Cultivation).  

error: Content is protected !!