Watermelon Rate: कलिंगडाची आवक वाढली; मिळत आहे 100 रुपयापर्यंतचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा म्हटला (Watermelon Rate) की उन्हाची तीव्रता वाढते आणि अशावेळी शरीरासाठी काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते. म्हणूनच उन्हाळ्यात कलिंगड (Watermelon) फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.  

बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईसह परिसरात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टरबूज विक्रीला आली आहेत. सध्या बाजारात हे लालबुंद कलिंगड 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतच्या दराने (Watermelon Rate) विकले जात आहे.  

कडक उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यानंतर शरीराला थंडपणा मिळतो. उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान बालकांपर्यंत सर्वांची पहिली पसंती कलिंगडला असते. ज्यूस सेंटर (Watermelon Juice) मध्ये सुद्धा यावेळी कलिंगडाला मागणी असते.

कलिंगड हे कमी काळात येणारे पीक असल्यामुळे बरेच शेतकरी कलिंगड लागवड करतात. शिवाय उन्हाळ्यात याला हमखास भाव सुद्धा मिळतो.

सामान्यता कलिंगडाचे दर (Watermelon Rate) आकारावरून किंवा किलोच्या दराने ठरवले जातात. बऱ्याच ठिकाणी

नगाप्रमाणेच खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी असल्याने छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे कलिंगडाला विशेष मागणी आहे. ग्रामीण भागातून कलिंगड वाहनामध्ये आणून शहरात विकले जात आहेत. छोटे शेतकरी दुचाकी, तीनचाकी वाहनांमधून कलिंगड विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

मंगळवार, शुक्रवार, रविवार या दिवशी भरणाऱ्या आठवडी बाजारात कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. वेगवेगळ्या स्तरातील लोकांकडून या फळाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

error: Content is protected !!