Weather Based Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात कोरडे वातावरण (Weather Based Crop Advisory) असले तरी विदर्भ मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे. अशा परिस्थितीत पिकांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊ या.

अशी घ्या पिकांची काळजी (Weather Based Crop Advisory)

 • गहू, हरभरा, करडई व भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करून शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
 • उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.
 • मोहरी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेटॉन (25 EC) @ 8 मिली किंवा डायमेथोएट (30EC) 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
 • भुईमुग पिकावरील फुलकिडी आणि मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (30EC) 17 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.   
 • आंबा मोहराचे तुडतुडे, कोळी, या किडींपासून संरक्षण करण्यासाठी डायमेथोएट 30 टक्के @16.5 मिली + पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डिनोकॅप 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
 • आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.
 • लिंबू वरील खैर्‍या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% @30 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन (100PPM) @ 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
 • टरबूज व खरबूज पि‍कावरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रोपेनोफॉस @ 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
 • वादळी वारा, पाऊस व गारपीटीमुळे  (Weather Based Crop Advisory) केळी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. मोडलेली झाडे बागेबाहेर काढावी. बागेत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
 • केळीवरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट @ 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.   
 • कांदा पि‍कावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.  
 • मिरची पिकावरील कोळी किडीच्या फेनप्रोपॅथ्रीन (30%EC) @ 5 मिली प्रति 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी.
 • वादळी वारा, पाऊस व गारपीटीमुळे  प्रादूर्भावग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून संरक्षणात्मक फवारणी घ्यावी.
 • पशुपालन: गारपीटीमुळे पशुधनास मोठ्या प्रमाणात इजा जखमा झाल्या असल्यास यावर तत्काल उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी हळद कडुलिंब तेल अथवा करंज तेलात ‍मिसळून जखमांवर लावावी अत्यंत कमी खर्चात हा उपचार होतो (Weather Based Crop Advisory).
error: Content is protected !!