Weather Forecast: यंदाचा मॉन्सून समाधानकारक, मात्र काही राज्यात कमी बरसणार! स्कायमेटचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा समाधानकारक मॉन्सून (Weather Forecast) पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने (Skymet Prediction) वर्तवला आहे.

सध्याचा उन्हाळा (Summer) हा सर्वांसाठी मोठा त्रासदायक जाणार आहे. राज्यात आता पासूनच उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकर्‍यांना या बातमीने नक्कीच समाधान मिळाले असणार. यंदा मॉन्सूनमध्ये (Monsoon) चांगला पाऊस होण्याची (Weather Forecast) शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र, यंदाच्या मॉन्सूनमध्ये यापासून दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मॉन्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज (Weather Forecast) स्कायमेटने वर्तवला आहे.

कसा असेल यंदाचा मॉन्सून? (Weather Forecast)

स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज देणार्‍या संस्थेच्या अहवालानुसार, यंदा समाधानकारक मॉन्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के  म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. एल निनोचं (El Nino) ला निनो (La Nina) मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

एल निनो कमजोर, पाऊस जास्त (El Nino Effect)

गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मॉन्सून पाहायला मिळाला मात्र,  यंदा मॉन्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो (el nino) कमजोर होऊ लागला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मॉन्सूनचा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!