Weather Forecast: महाराष्ट्रात वाढत्या तापमाना सोबतच, पुन्हा अवकाळीचा इशारा! जाणून घ्या हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात सध्या मिश्र प्रकारचे हवामान (Weather Forecast) दिसून येत आहे. काही ठिकाणी सध्या उष्णतेचा पारा वाढलेला असून विदर्भ, मराठवाडा सोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका (Heat Wave) जाणवायला लागला आहे. तर काही भागात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट अजूनही कायम आहे (Weather Forecast).

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून सामान्य नागरिक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. तीव्र उन्हाने नागरिक सुद्धा हैराण झाले आहेत. विदर्भात काल तापमान 44.3 अंशांवर गेले होते. अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तापमानाच्या पट्टीच्या छटा काळ्या रंगाकडे जात असल्याचे हवामान (Weather Forecast) विभागाच्या नकाशावरून दिसून येते.

तर दुसरीकडे येत्या 24 तासांत विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने (IMD) सांगितलं आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते, असा अंदाजही (Weather Forecast) वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात सर्वाधिक तापमान

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून कमाल तापमान 45 अंशांच्या पाऱ्याकडे झुकले आहे. भंडारा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले होते. अकोल्यात 44.3 अंश तर वाशिम 43, अमरावती 43.8, यवतमाळ 43.8, नागपूर 41.5 तर गोंदिया येथे 40.4 अंश तापमानाची नोंद झालेली आहे.  

मराठवाड्यातही उन्हाचा चटका 

मराठवाड्यात बहुतांश भागात तापमान 40 पार झाले असून  परभणी 43.6, नांदेड 43.2, बीड 43.1, धाराशिव 42.6, छत्रपती संभाजीनगर 41.6 अंशांवर पोहोचले होते. आजपासून मराठवाड्यात काही भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात पारा चढता

मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढाच असून 40 ते  44 अंशांपर्यंत तापमान नोंदवले जात आहे. सोलापूर मध्ये काल 43.4 अंशांची नोंद झाली असून अहमदनगर येथे 40.8 अंशांवर जाऊन पोहोचले होते.

राज्यात कुठे कोसळणार पाऊस? (Weather Forecast)

विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिव मध्ये आजपासून पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस होऊ शकतो (Weather Forecast).

error: Content is protected !!