Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.

उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक परेशान आहेत तेवढेच नुकसान शेतकर्‍यांचे सुद्धा होत आहे.

काल 17 एप्रिल ला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या ठिकाणी सायंकाळी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गारपिटीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सांगली जिल्ह्यातही गारपीट (Hailstorm) झाली आहे.

सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी तुफान वादळी पावसाने (Thunderstorm) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अशातच हवामान तज्ज्ञांनी महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती (Cyclone) तयार झाली आहे. याचा परिणाम म्हणून गुजरात मधून कोकण तसेच मध्य महाराष्ट्राकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहेत (Weather Forecast).

फक्त अरबी समुद्रातूनच नाही तर बंगालच्या उपसागरातून देखील आपल्या महाराष्ट्राकडे उष्ण वारे (Hot Wind) येत आहेत. बंगालच्या उपसागरातून छत्तिसगड, तेलंगाना मार्गे महाराष्ट्रातील विदर्भ विभागात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत.

हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे गुरूवार शुक्रवार आणि शनिवार हे पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज (Weather Forecast) आयएमडीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस? (Weather Forecast)

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज 18 एप्रिल गुरूवारी राज्यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर व बीडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज (Weather Forecast) आहे.

याशिवाय, शुक्रवारी आणि शनिवारी देखील विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात वि‍जांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत असलेल्या आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे पुढील पाच ते सात दिवस राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आगामी काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता कायम राहणार आहे (Weather Forecast).

error: Content is protected !!