Weather Forecast : हवामान अंदाज कसा वर्तवला जातो? कोणत्या पद्धती वापरल्या जातात? वाचा.. सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Forecast) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीठ असे संमिश्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) देखील सातत्याने याबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहे. याशिवाय यंदाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभाग बरेच दिवस आधीच पावसाचा अंदाज बांधून, शेतकऱ्यांना आगाऊ माहिती देत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण हवामान विभागाला (Weather Forecast) नेमकी ही माहिती अगोदर कळते कशी? याबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

महत्वाच्या तीन पद्धती कोणत्या? (Weather Forecast Methods)

जागतिक हवामान संघटनेनेनुसार, महिनाभर अगोदर वर्तवला जाणारा अंदाज हा दीर्घकालीन हवामानाचा अंदाज (Weather Forecast) असतो. हा अंदाज वर्तवण्यासाठी हवामान विभाग वेगवेगळ्या पद्धती वापरते. यात सर्वसाधारणपणे सांख्यिकी पद्धत, डायनॅमिकल पद्धत, डायनॅमिकलसह सांख्यिकी पद्धत या ३ पद्धती वापरल्या जातात.

1. सांख्यिकी पद्धत : हंगामी किंवा दीर्घकालिन पावसाचा अंदाज करण्यासाठी मुख्यत: सांख्यिकी पद्धतीचा वापर केला जातो. हवामान विभाग मॉन्सूनच्या पावसाचे अंदाज पद्धतीच्या माध्यमातूनच व्यक्त करत असतो.

2. डायनॅमिकल पद्धत : डायनॅमिकल पद्धत ही गतिमानेवर अवलंबून असून, यात वाऱ्याची दिशा, गती असे सर्व घटक लक्षात घेऊन पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात.

3. डायनॅमिकलसह सांख्यिकी पद्धत : डॉयनॅमिकल कम सांख्यिकी पद्धत वस्तूस्थितीवर आधारित आहे. मॉडेल्स किंवा अंकीय हवामान अंदाज व प्रत्यक्षात त्या भागात असणारे हवामान यात काहीशी तफावत असते. त्यामुळे विविध जागतिक व प्रादेशिक अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगळे हवामानाचे अंदाज असतात.

अंदाजासाठी कोणते घटक महत्वाचे?

हवामानाचा अंदाज (Weather Forecast) बांधण्यासाठी विविध उपकरणांच्या साह्याने वातावरण, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, दव, ढगांची स्थिती इत्यादी घटकांचे निरीक्षण केले जाते. यासाठी अनेक प्रकारची यंत्रे आणि उपकरणे वापरली जातात. पावसासाठी पर्जन्यमापक, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर, वाऱ्याची दिशा तपासण्यासाठी विंडव्हेन, बाष्पीभवनाचा दर मोजण्यासाठी पॅन-इव्हॅपोरिमीटर, सनशाइन रेकॉर्डर, दव मोजण्यासाठी ड्यू-गेज, जमिनीचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर यांचा वापर केला जातो.

याशिवाय हाय-स्पीड कम्प्युटर, हवामानविषयक उपग्रह, एअर बलून आणि वेदर रडार ही उपकरणंदेखील हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी वापरली जातात. या गोळा केलेल्या सर्व डेटाचा अभ्यास केला जातो. याशिवाय हवामान खात्याचे अनेक उपग्रह आहेत. याशिवाय रडारद्वारे पाठवलेल्या वेव्ह्ज ढगांवर आदळून परत येतात आणि नंतर त्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कुठे पाऊस पडू शकतो, याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातो.

पावसाचे प्रमाण कसे निश्चित केले जाते?

कुठे किती पाऊस पडला? याची माहिती देखील हवामान विभागाकडून दिली जाते. पावसाचे मोजमाप करण्यासाठी हवामान विभागाकडे फनेल्स असतात. फनेलवर एमएममध्ये आकडे लिहिलेले असतात. पाऊस थांबल्यानंतर हे आकडे बघून कोणत्या ठिकाणी किती मिलिमीटर पाऊस पडला हे जाहीर केले जाते. 24 तासांसाठी, 1 ते 3 दिवसांसाठीचा लघू मुदतीचा अंदाज, 4 ते 10 दिवसांसाठी मध्यम मुदतीचा अंदाज आणि 10 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा विस्तारित मुदतीचा अंदाज, असे हे चार प्रकारचे अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केले जातात.

error: Content is protected !!