Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे . हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानमध्ये पोहचलेला मान्सून चा प्रवास काहीश्या जलदगतीने सुरु झाल्याने तीन ते चार दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये धडकत आणि मग केरळच्या दिशेने सरकेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा प्रवास तामिळनाडूच्या दिशेने काहीश्या वेगानेच होत असल्याने तामिळनाडू किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पण तत्पूर्वी काल मध्यरात्री कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून गांधीनगर मध्ये सजवलेले एक लग्न मंडपात वादळीवाऱ्याने कोलमडून गेले आहे . वाऱ्याचा वेग हा इतका जबरदस्त होता कि लॉन मध्ये टाकण्यात आलेल्या मंडपाचे पत्रे देखील उडून मंडप क्षणार्धात जमीनदोस्त झाले. ज्यामुळे काहीजण जखमी झाले असून काही काळ गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली होती.

बारामती शहरातही सोमवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती . ह्या अवकाळी पावसामुळे हवेत पसरलेल्या गारव्याने उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना थंड हवेची झुळूक अनुभवता आली. तर पंढरपुरात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली असून मर्यादित काळापर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

error: Content is protected !!