हवामान अंदाज : पुढील 5 दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान; थंडीची लाट नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री, पहाटे थंडी अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक अकरा रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज आहे तसंच तापमानातही चढ-उतार होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढत आहे राजस्थानच्या चुरू येथे दिनांक दहा रोजी शुक्रवारी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 4.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या राज्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान होत आहेत दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे.

राज्याच्या कमाल तापमानाचा पारा वाढला असून कोकण मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान 30 अंश यांच्यापुढे केला आहे तर राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात पंधरा वर्षांच्या पुढे गेले आहे शुक्रवारी दिनांक दहा रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी 34 पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेलेत महाबळेश्वर येथून एक छान की 14.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

थंडीची लाट नाही
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात कोणताही विशेष बदल झालेला नाही, त्यामुळे पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!